फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काही तासांमध्ये फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. मागील 6 सामन्यांमध्ये भारताच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे, शेवटचा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे, हा सामना जो संघ जिंकेल तो संघ ट्राॅफी जिंकणार आहे. सोशल मिडियावर सध्या एक चर्चा सुरु आहे ती म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लेइंग ११ मध्ये शिवम दुबे असणे गरजेचे आहेत.
भारताच्या संघामध्ये दमदार खेळाडू आहेत, पण मागील सामन्यामध्ये शिवम दुबे याला श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताचा संघ हा सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता असा समज भारतीय क्रिकेट चाहत्यांचा आहे. याचे नक्की कारण आणि अशा प्रकारचा भारतीय क्रिकेट चाहत्याचा समज का आहे. यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
भारताचा अष्टपैलू शिवम दुबे याने त्याच्या बॅटने आशिया कपमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही पण त्याने गोलंदाजीने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर आश्चर्यकारक म्हणजे आतापर्यत जे सामने शिवम दुबेने भारतीय संघासाठी खेळले आहेत त्या सामन्यांपैकी कोणताही सामना भारताने गमावलेला नाही. त्याने जे सामने टीम इंडियासाठी खेळले आहेत ते सर्व सामने त्याने जिंकले आहेत त्यामुळे भारतासाठी शिवम दुबे लकी चार्म आहे अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे.
हार्दिकच्या दुखापतीनंतर, संघ व्यवस्थापनाने शिवम दुबेवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला आहे. दुबे अलिकडच्या काळात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे तो हार्दिकची जागा घेण्यास योग्य ठरतो. शिवम दुबेची ताकद म्हणजे लांब फटके मारण्याची आणि गरज पडल्यास योगदान देण्याची त्याची क्षमता. म्हणूनच २०२५ च्या आशिया कपच्या अंतिम फेरीसाठी त्याचे अंतिम संघात पुनरागमन जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
India losing with Shivam Dube on the field? Not possible! 🔥#INDvsSL #AsiaCup2025 #TeamIndia #IndianCricket #ShivamDube pic.twitter.com/zLvMtpqBkO — CRICKETNMORE (@cricketnmore) September 27, 2025
संघाला त्याच्याकडून मधल्या फळीत स्थिरता आणि गोलंदाजीला अतिरिक्त पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. शिवम दुबेने आशिया कप २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने युएई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट्स घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि इम्पॅक्ट प्लेअर अवॉर्डही जिंकला. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सुपर फोर सामन्यात त्याने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, ज्यामुळे भारतीय संघाला पुनरागमन करण्यास मदत झाली.