
IND vs SA 2nd ODI: India sets 359 runs target for South Africa in Raipur! Powerful centuries from Rituraj-Virat
IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर ३५८ धावा केल्या. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी धावा कराव्या लागणार आहेत. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने १०५ धावा तर विराट कोहलीने १०२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताची सुरुवात फार चांगली राहू शकली नाही. ४० धावांवर भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला झटका बसला. रोहित शर्माला १४ धावांवर नांद्रे बर्गरने माघारी पाठवले. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली मैदानावर आला. रोहितनंतर यशस्वी जैस्वाल देखील झटपट बाद झाला आणि तो २२ धावांवर मार्को जॅनसेनचा बळी ठरला. त्यानंतर चौथ्या नंबरवर आलेला ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी १९५ धावांची मोठी भागीदारी रचली आणि भारताच्या धावसंख्येचा पाया रचला.
ऋतुराज आणि विराट या दोघांनी शानदार फलंदाजी करत आपपली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर दोघांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला. या दरम्यान ऋतुराज गायकवाडने ७८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर गायकवाड बाद झाला. ऋतुराज गायकवाडने ५३ चेंडूत १०५ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि २ षटकार लागवले. त्याला मार्को जॅनसेनने बाद केले.
ऋतुराजनंतर विराट कोहलीने देखील आपला पहिल्या सामन्यातील फॉर्म कायम लागोपाठ शतक झळकवले. त्याचे एकदिवसीय स्वरूपातील ५३ वे शतक ठरले. विराट आपले शतक पूर्ण करून बाद झाला. त्याने ९३ चेंडूत १०२ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याला एनगिडीने माघारी पाठवले. वॉशिंग्टन सुंदर १ धावा करून बाद झाला. तर कर्णधार केएल राहुल ६६ धावा करून तर रवींद्र जडेजा २४ धावा करून नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर आणि एनगिडीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘विराट’ दर्शन! कोहलीने झळकवले 53 वे एकदिवसीय शतक
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,
दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, एनगिडी .
बातमी अपडेट होत आहे..