
IND vs SA 2nd ODI; Rohit Sharma's 'Hitman' show in Raipur! Created history by scoring 14 runs; 'The Wall' left Dravid behind
IND vs SA 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निसणी घेतला तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारतीय फलंदाजांनी आपली दमदार सुरुवात केली. या सामन्यात भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने इतिहास रचला आहे.
हेही वाचा : IND vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘विराट’ दर्शन! कोहलीने झळकवले 53 वे एकदिवसीय शतक
प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने संघाला आक्रमकपणे सुरुवात करून दिली. खरी पण जास्त वेळ ही जोडी मैदानात टिकू शकली नाही. या जोडीने त्यांनी फक्त चार षटकांत २८ धावा केल्या. रोहितला सुरुवातीच्या षटकांत जास्त चेंडू खेळता आले नाहीत, परंतु संधी मिळताच त्याने त्याच्या शैलीत चौकार मारण्यास कसली कसूर सोडली नाही. या दरम्यान त्याने एक परकरां देखील केला.
सलामीवीर रोहित शर्माने पहिल्या चार षटकांमध्ये फक्त तीन चेंडूत २ धावा काढल्या होत्या. त्यानंतर त्याने नांद्रे बर्गरच्या षटकात सलग तीन चौकार मारून आक्रमक शैली स्वीकारली. या दरम्यान त्याने एक महत्त्वाचा टप्पा देखील गाठला. या चौकारांसह रोहितने भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ९००० धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी रोहित शर्माला ही कामगिरी करण्यासाठी फक्त नऊ धावांची आवश्यकता होती. रोहित शर्मा आता घरच्या मैदानावर ९००० धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी ही किमया साधली होती.
रोहित शर्माने नांद्रे बर्गरला मारलेला तिसरा चौकार हा खास ठरला. कारण या एकाच शॉटने त्याने भारतीय भूमीवर दिग्गज राहुल द्रविडला पिछाडीवर टाकले. आता, रोहित शर्मा आता घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे.
रोहित शर्माने तीन चौकार मारल्यानंतर उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला मात्र तो नांद्रे बर्गरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने १४ धावा काढल्या. सामान्याबाबत सांगायचे झाल्यास ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केएल राहुलने देखील नाबाद ६६ धावा काढत संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.