
IND vs SA 2nd ODI: What happened at the Raipur ground? Fan runs towards Virat Kohli; Video Viral
Fans flock to the stadium to meet Virat Kohli : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 डिसेंबर रोजी दूसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दूसरा एकदिवसीय सामना छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातील चहापानाच्या वेळी एक धक्कादायक प्रकार घडला. विराट कोहली क्रीजवर असताना, अचानक एक तरुण सुरक्षा रक्षकांचा ताफा तोडून मैदानाच्या मध्यभागी येऊन पोहोचला. त्या तरुणाला कोहलीपर्यंत पोहोचायचे होते. परंतु, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले. बाउन्सर्सनी त्याला खांद्यावर घेऊन मैदानाबाहेर नेले. या घटनेवरुन स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.
हेही वाचा : Virat Kohli आणि Rohit Sharma यांनी आफ्रिकन प्रशिक्षक कॉनराडशी हॅन्डशेक केला नाही? व्हिडिओने केले सत्य उघड
सामनादरम्यान एखाद्या चाहत्याने सुरक्षा रक्षकांना चकवून मैदानात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. रांचीमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील एका चाहत्याने मैदानात घुसून विराट कोहलीच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा व्यवस्थेकडून तातडीने कारवाई करण्यात येऊन त्याला मैदाना बाहेर काढले होते. रायपूरच्या घटनेनंतरही, सामना फारसा विस्कळीत झाल्याचे दिसले नाही. काही क्षणांनंतर, खेळ पुन्हा एकदा सामान्यपणे सुरू झाला आणि प्रेक्षकांनी खेळाडूंचा जयजयकार केला. या घटनेवरून विराट कोहलीची प्रचंड लोकप्रियतेचे दर्शन होते. परंतु सुरक्षेला आणखी बळकटी देण्याची गरज देखील यावरून स्पष्ट होते.
Another pitch invader today who came in to touch Kohli’s feet 🙏 pic.twitter.com/8Vaw0GItkA — cheesy fries (@kyabatauvro) December 3, 2025
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळवण्यात आला. टॉस गमाणाऱ्या भारताने प्रथम फलंदाजी करत ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर ३५८ धावांचा मोठा आकडा उभा केला. परंतु, भारतीय संघ गोलंदाज या मोठ्या धावसंख्येचा बचाव करू शकले नाहीत. परिणामी दक्षिण आफ्रिकेने चार चेंडू शिल्लक असताना ३५९धावांचे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात भारताच्या पराभवाचे मुख्य कारण भारताची गोलंदाजी ठरली आहे.
हेही वाचा : 6,6,6,6,6….RCB ने सोडलं अन् फलंदाजाने केला कहर! ठोकल्या एका षटकात 33 धावा, Video Viral
३५९धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामने या सामन्यात सामना जिंकून देणारी खेळी केली. त्याने शानदार शतक झळकवले. त्याने ९८ चेंडूंचा सामना केला आणि ११० धावा केल्या. एकूणच, मार्कराम दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरं हीरो ठरला. मार्कराम व्यतिरिक्त, मॅथ्यू ब्रेट्झकी आणि कर्णधार डेवाल्ड ब्रेव्हिस यांनीही अर्धशतके झळकावली आणि दक्षिणआफ्रिकेने भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.