फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटी कसोटीदरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी एक वादग्रस्त विधान केले. पहिल्या डावात २८८ धावांची आघाडी असूनही फॉलो-ऑन लागू न करण्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, “आम्हाला त्यांना (भारताने) खरोखरच गुडघे टेकताना पाहायची अशी आमची इच्छा होती.” या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या टिप्पणीमुळे दोन्ही देशांतील क्रिकेट तज्ज्ञ संतापले, पण आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारतीय दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा आफ्रिकन संघाचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्याशी हॅन्डशेक करण्यास नकार देताना दिसत आहेत. तथापि, दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये रोहित शर्मा डोके हलवताना दिसत आहे, जरी त्यांच्याशी हस्तांदोलन करत नाही.
खरंतर, हा व्हायरल व्हिडिओ भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय मिळवल्यानंतरचा असल्याचे म्हटले जात आहे, ज्यामध्ये सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत आहेत, परंतु व्हिडिओमध्ये असे दिसून येते की रोहित आणि कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्याशी हस्तांदोलन केले नाही.
तथापि, वेगळ्या कोनातून काढलेल्या व्हिडिओने हा दावा खोटा ठरवला. व्हिडिओमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा कॉनराडला अभिवादन करताना स्पष्ट दिसत आहे. तथापि, विराट कोहली कॉनराडशी हस्तांदोलन करत असल्याचा कोणताही पुरावा नव्हता.
Rohit Sharma did not shake hands with the South African head coach after winning the first ODI. 🫡🇮🇳❤️ pic.twitter.com/ICNDDbgzjy — Mamta Jaipal (@ImMD45) December 3, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला ३५९ धावांचे लक्ष्य राखता आले नाही. पाहुण्या संघाने ६ विकेट्स गमावल्यानंतर ५० व्या षटकात लक्ष्य गाठले. संघाकडून एडेन मार्करामने शतक झळकावले. दरम्यान, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि मॅथ्यू ब्रेट्झकीने अर्धशतके झळकावत मालिका १-१ अशी बरोबरी साधली. सामन्यात भारताने विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांच्या जोरावर ३५८ धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने अर्धशतक झळकावले.
पण धावांचा डोंगर उभारुनही भारताच्या पदरात पराभव होता. त्याचे कारण म्हणजेच टीम इंडियाची गोलंदाजी आणि फिल्डिंग आहे. या पराभवानंतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात भारताच्या संघाला ट्रोल केले जात आहे.






