Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs SA 2nd Test : ‘यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही…’, अजिंक्य रहाणेचा गंभीरच्या धोरणावर निशाणा 

पहिला सामना गमावलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक आहे. यावेळी अजिंक्य रहाणेने कोच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 21, 2025 | 08:00 PM
Ind vs SA 2nd Test: 'You won't get anything from this...', Ajinkya Rahane takes aim at Gambhir's policy

Ind vs SA 2nd Test: 'You won't get anything from this...', Ajinkya Rahane takes aim at Gambhir's policy

Follow Us
Close
Follow Us:

Ajinkya Rahane criticizes Gambhir’s policy : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.  गंभीर आणि त्याच्या संघासमोर अनेक आव्हान असताना त्यांना असंख्य प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागत आहे. दरम्यान, आता माजी फलंदाज आणि भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघ व्यवस्थापनाला क्रमांक ३ च्या फलंदाजीच्या स्थानाशी अतिरेकी छेडछाड करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : ‘कधीकधी तर तो एक अजेंडा वाटतो’ गंभीरवरील टीकेवर कोटक सितांशू यांचे भाष्य

भारतासाठी अनेक वर्षांपासून क्रमांक ५ वर फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने क्रमांक ३ च्या फलंदाजासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या धोरणावर जोरदार टीका केली आहे. कारण गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून, भारतीय व्यवस्थापनाने साई सुदर्शन, शुभमन गिल, करुण नायर आणि आता वॉशिंग्टन सुंदर यांना क्रमांक ३ वर पाठवण्याचे प्रयत्न केले आहेत. वास्तविक पाहता, पुजाराच्या निवृत्तीनंतर किंवा संघातून बाहेर पडल्यानंतर, निवडकर्त्यांना या स्थानावर कायमस्वरूपी फलंदाज शोधण्यात अपयश आले आहे.

याबाबत, अजिंक्य रहाणेने रविचंद्रन अश्विनच्या “आश की बात” या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “या स्थानावर विशिष्ट तयारीची आवश्यकता असते. यामध्ये सतत बदल करून प्रभुत्व मिळवता येत नसतो. मी येथे साई सुदर्शनचा उल्लेख करणार आहे. त्याने चांगली कामगिरी केली, त्याने ८७ आणि ३९ धावा केल्या आहेत.”

तसेच रहाणे पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरता तेव्हा तुम्हाला वेगळ्या कौशल्याची आवश्यकता असते. तर ६ आणि ७ क्रमांकासाठी वेगवेगळ्या गुणांची आवश्यकता असते. वाशी हा एक उत्तम खेळाडू आहे. तो अविश्वसनीयपणे प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे त्याच्यासाठी खूप गोंधळात टाकणारे असणार आहे. त्याने याचा विचार करायला हवा. माझा विश्वास आहे की वाशी हा एक गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे.” असे देखील रहाणे म्हणाला.

हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर! ऋतुराज गायकवाड करणार नेतृत्व..

अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, “जर वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवायचे असेल तर वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकअसणार आहे. तसेच, व्यवस्थापनाने त्याला अधिक वेळ देणे देखील गरजेचे आहे. खालच्या क्रमाने फलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या कौशल्याची आवश्यकतेची गरज असते. वॉशिंग्टन सुंदर असो किंवा साई, कोणत्याही खेळाडूला सुरक्षा प्रदान करणे गरजेचे असल्याचे देखील गरजेचे आहे.”

Web Title: Ind vs sa 2nd test ajinkya rahane criticizes gautam gambhirs policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Gautam Gambhir
  • IND vs SA Test
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

Ind vs SA 2nd Test : ‘कधीकधी तर तो एक अजेंडा वाटतो’ गंभीरवरील टीकेवर कोटक सितांशू यांचे भाष्य 
1

Ind vs SA 2nd Test : ‘कधीकधी तर तो एक अजेंडा वाटतो’ गंभीरवरील टीकेवर कोटक सितांशू यांचे भाष्य 

Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून गिल बाहेर! प्रिन्सच्या जागा घ्यायला ‘या’ दोन खेळाडूंचे नाव चर्चेत 
2

Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून गिल बाहेर! प्रिन्सच्या जागा घ्यायला ‘या’ दोन खेळाडूंचे नाव चर्चेत 

Ind vs SA 2nd Test : गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंत सांभाळणार संघाची धुरा! कर्णधारपदी निवड झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया… 
3

Ind vs SA 2nd Test : गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंत सांभाळणार संघाची धुरा! कर्णधारपदी निवड झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया… 

कोलकाता खेळपट्टी वाद! गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्स क्युरेटर पुन्हा भिडले? वाचा सविस्तर 
4

कोलकाता खेळपट्टी वाद! गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्स क्युरेटर पुन्हा भिडले? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.