
India vs South africa 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आज शेवटचा आणि तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर २७० धावा उभ्या केल्या आहेत. भारताला विजयासाठी २७१ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून कुलदीप यादव आणि कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दक्षिण आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरला. दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दक्षिण आफ्रिकेने आपला पहिल गडी १ धावा असताना गमावला. रायन रिकेल्टनला र्शदीप सिंगने भोपळा ही फोडू दिला नाही. त्यानंतर मात्र सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला कर्णधार टेम्बा बावुमा यांनी डाव सांभाळला. या दोघांनी संघासाठी ११० धावांची भागीदारी रचली.
South Africa are all out for 2⃣7⃣0⃣ in Vizag Prasidh Krishna with the final wicket of the innings 😎 He finishes with a four-wicket haul 🙌 Scorecard ▶️ https://t.co/HM6zm9o7bm#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5mays2y5uS — BCCI (@BCCI) December 6, 2025
टेम्बा बावुमा ४८ धावा करून बाद झाला. त्याला रवींद्र जडेजाने बाद केले. त्यानंतर एका बाजूने डी कॉक खेळत असताना दुसरीकडे मात्र फलंदाज बाद होत राहिले. दरम्यान क्विंटन डी कॉकने आपले शतक पूर्ण केले. तो ८९ चेंडूत १०६ धावा करून बाद झाला. त्याने ८ चौकार आणि ६ षटकार लागावले. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिका संघाची चांगलीच घसरगुंडी झाली.
मॅथ्यू ब्रेट्झके २४, डेवाल्ड ब्रेविस २९, एडन मार्कराम १, डेवाल्ड ब्रेविस २९, मार्को जॅन्सन १७, कॉर्बिन बॉश ९, , ओथनील बार्टमन ३, लुंगी एनगिडी १ धावा करून बाद झाले तर केशव महाराज २० धावा काढून नाबाद राहिला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. यामध्ये कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तर जडेजा आणि र्शदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट काढली.
हेही वाचा : कधीकाळी बाथरूममध्ये रडायचा! आता भारतीय संघात पुनरागमनासाठी थोपटले दंड; वाचा सविस्तर
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृण्षा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि र्शदीप सिंग.
एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, रायन रिकेल्टन, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, ओथनील बार्टमन, लुंगी एनगिडी.
बातमी अपडेट होत आहे…