रियान पराग पुनरागमनासाठी सज्ज(फोटो-सोशल मीडिया)
Riyan Parag ready to return to Indian team : राजस्थान रॉयल्सचा स्थायी कर्णधार रियान पराग आता चर्चेत आला आहे. त्याचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तो भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. कधीकाळी भारतीय संघाच्या टी-२० प्लॅनमध्ये त्याने नाव सतत सहभागी असत असे. पराग एक वनडे देखील खेळलेला आहे. परंतु गेल्या ४८६ दिवसांपासून तो भारतीय संघाबाहेर आहे. दरम्यान, त्याने आता, परागने या दीर्घ विश्रांती दरम्यान त्याला सामना कराव्या लागलेल्या मानसिक आणि भावनिक आव्हानांचा खुलासा केला असून त्याने पुनरागमन करण्याची आपली मनीषा देखील स्पष्ट केली आहे.
हेही वाचा : IND vs SA ODI series : “सुंदरची भूमिका स्पष्ट…” भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे विधान चर्चेत
द हिंदूशी संवाद साधताना परागने मान्य केले की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करून देखील त्याला आयपीएलमध्ये धावांसाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. तो म्हणाला की, सतत धावा न काढण्याचा दबाव इतका वाढला की, तो आपला संयम गमावून बाथरूममध्ये जाऊन रडत असे. पुढे तो म्हणाला की त्याला घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये तीन ते चार वर्षे संघर्ष देखील करावा लागला. दुखापतीतून परतणे कठीण राहिले. कारण फिटनेस आणि आत्मविश्वास दोन्ही आता पुन्हा तयार करावे लागले आहे.
पराग पुढे म्हणाला की, त्याच्या अयशस्वी आयपीएल खेळींमुळे तो कोसळला होता. त्याने हे देखील कबूल केले की प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला की तो स्वतःवर नाराज होत असे आणि अनेकदा त्याच्या भावना लपवण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन रडत असे. SMAT सारख्या स्पर्धा पूर्णपणे स्नायूंच्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहिलेल्या असतात. जर एखादा खेळाडू फॉर्ममध्ये असेल तर धावा येत राहतात, परंतु कामगिरी चांगली झाली नाही की, आयपीएलसारख्या मोठ्या टप्प्यावर काय होईल याची भीती वाढत असते. या भीतीमपोटी त्याला अनेकवेळा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
रियान पराग भारताकडून शेवटचा १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बांगलादेशविरुद्ध खेळलेला आहे. त्यानंतर दुखापती आणि फॉर्ममुळे त्याला बाहेर पडावे लागले होते. पण आता पराग म्हणतो की त्याला परतण्याचा आत्मविश्वास आहे. तो म्हणाला की, त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि तो व्हाईट-बॉल दोन्ही फॉरमॅटमध्ये देखील खेळण्याची क्षमता ठेवतो.






