
IND vs SA 4th T20I: The man sold 3 sacks of wheat for a ticket! The match was cancelled, and the fan's anger was uncontrollable.
IND vs SA 4th T20I match cancelled : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. बुधवारी या मालिकेतील चोथा सामना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता, परंतु, दाट धुक्यामुळे हो सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. चाहत्त्यांनी तिकिटांच्या परतफेडीची मागणी देखील केली. सामना रद्द झाल्यानंतर स्टेडियमबाहेरील चाहते संतप्त झालेले दिसुन आले. अनेक प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाल्या. स्टेडियमबाहेरील एका प्रेक्षकांने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, त्याने तिकीट खरेदी करण्यासाठी तीन पोते गहू विकला होता.
धुक्याच्या प्रभावामुळे सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. पंचांनी सुमारे सहा वेळा मैदानाची चाचपणी केली, परंतु, विस्तृत तपासणी आणि विचारविनिमयानंतर, अखेर रात्री ९:२५ वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रद्द झाल्यानंतर एकाना स्टेडियमबाहेरील चाहते खूपच नाराज झाल्याचे दिसून आलेत. अनेकांनी त्यांच्या तिकिटांचे पैसे परत मिळावेत यासाठी मागणी देखील केली. स्टेडियमबाहेरील एका प्रेक्षकांनी तिकीट खरेदी करण्यासाठी तीन पोती गहू विकल्याचे आता समोर आले आहे. त्या चाहत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.
#WATCH | Lucknow, UP: Cricket fans express their disappointment as IND vs SA 4th T20 match gets abandoned without a ball being bowled, due to fog. A fan says, “I sold three sacks of wheat and came here to watch the match. I want my money back…” pic.twitter.com/tMXf7Xo02Y — ANI (@ANI) December 17, 2025
सामना रद्द झाल्याची बातमी कळताच, सामना पाहण्यासाठी आलेल्या मोठ्या संख्येने चाहत्यांचा हिरमोड झाला. चाहत्यांनी महागडी तिकिटे खरेदी केली होती आणि बराच वेळ सामना सुरू होण्याची वाट देखील पाहिली. संतप्त चाहते बीसीसीआयचा निषेध करत स्टेडियमबाहेर पडले आणि त्यांनी तिकीटांचे पैसे परत मागितले. दरम्यान, एका चाहत्याने आपली निराशा व्यक्त करताना म्हटले की, “तिकीट खरेदी करण्यासाठी तीन पोती गहू विकला होता.” चाहत्याने त्याच्या तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी देखील केली.
हेही वाचा : IND vs SA 4th T20I : जसप्रीत बुमराहचा संयम सुटला! रागात चाहत्याचा फोन घेतला हिसकावून; VIDEO VIRAL
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना काल लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु, हा सामना रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द करण्यामागील मुख्य कारण म्हणजे लखनौमध्ये पसरलेले दाट धुके, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि अखेर पंचांना हा सामना रद्द करावा लागला. पंच तपासणीसाठी मैदानात आल्यावर चाहते सामन्याच्या आशेने वाट पाहत असल्याचे दिसत होते. त्यांनी फलंदाजाच्या क्रीझवरून फ्लडलाइट्सची पाहणी केली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला आहे. हे अपरिहार्य होते, कारण दृश्यमानता सुधारण्याची कोणतीही शक्यता नव्हती.