जसप्रीत बुमराहचा संयम सुटला(फोटो-सोशल मिडीया)
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौता सामना लखनौमध्ये खेळला जाणार होता, परंतु, धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे सामना रद्द करावा लागला. दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रागावलेला दिसुन येत आहे. बुमराह इतका रागावला आहे की त्याने फोन हिसकावून घेतला आहे. बुमराहशी संबंधित घटनेचा हा व्हिडिओ विमानतळावरील असून तो रांगेत उभा असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, चाहत्याने बुमराहसोबत काय केले म्हणुन तो चिडला होता? खरं तर, चाहता विमानतळावर रांगेत उभा होता. जेव्हा त्याला बुमराह त्याच्या शेजारी रांगेत दिसुन आला तेव्हा त्याने परवानगीशिवाय त्याचा सेल्फी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. तेव्हा बुमराहने सुरुवातीला चाहत्याला असे करण्यापासून रोखले आणि व्हिडिओ न घेण्याचा इशारा देखील दिला. पण जेव्हा त्याने त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा बुमराहने त्याचा संयम गमावला आणि त्याचा फोन हिसकावून फेकून देण्यातचे कृत्य केले.
What an arrogant behavior by Jasprit Bumrah. First he threatened his fan that he would throw his phone, and later he snatched the fan’s phone. pic.twitter.com/O2e4jSLw7s — 𝐆𝐨𝐚𝐭𝐥𝐢𝐟𝐢𝐞𝐝 👑 (@Goatlified) December 17, 2025
जसप्रीत बुमराह सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चालू टी२० मालिकेत टीम इंडियाचा महत्वाचा भाग आहे. कटकमध्ये खेलवण्यात आलेल्या पहिल्या टी२० सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. मुल्लानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० मध्ये मात्र त्याला विकेट घेता आली नाही. जसप्रित बुमराह वैयक्तिक कारणांमुळे धर्मशाळेत तिसऱ्या टी२० मध्ये खेळू शकला नव्हता. लखनौमध्ये खेळला जाणारा चौथा टी२० सामना रद्द करण्यात आला असून मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी२० सामना आता १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु, हा सामना रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द करण्यामागील मुख्य कारण म्हणजे लखनौमध्ये पसरलेले दाट धुके, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि अखेर पंचांना हा सामना रद्द करावा लागला.






