Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये हार्दिक पंड्या बरसला! सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा युवराज सिंगनंतर दुसराच भारतीय 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना आज  अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल जात आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे लक्ष्य दिले आहे. हार्दिक पंड्याने या सामन्यात खास कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 19, 2025 | 09:53 PM
IND vs SA 5th T20I: Hardik Pandya shines in Ahmedabad! He is the second Indian after Yuvraj Singh to score the fastest half-century.

IND vs SA 5th T20I: Hardik Pandya shines in Ahmedabad! He is the second Indian after Yuvraj Singh to score the fastest half-century.

Follow Us
Close
Follow Us:

Hardik Pandya’s fastest half-century : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना आज  अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर  ५ बाद २३१ धावा उभ्या केल्या आहेत.  या सामन्यात  हार्दिक पंड्याने फक्त १६ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या आणि तो अर्धशतक पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला. सर्वात कमी अर्धशतकाचा विक्रम भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या नावावर आहे, ज्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध फक्त १२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.

हेही वाचा : IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला

हार्दिक पंड्या जेव्हा मैदानात आला तेव्हा त्याने आपल्या डावाची सुरुवातच एका षटकाराने करून आपले इरादे स्पष्ट केले.  त्यानंतर त्याने मागे वळून पहिले नाही.  लिंडेने टाकलेल्या एका षटकात त्याने दोन चौकार आणि तेवढेच षटकार देखील ठोकले. १७ व्या षटकात षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पंड्याने १६ व्या चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत मोठी कामगिरी केली. यासह, तो अर्धशतक पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज देखील ठरला.

सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज

    1. १२ – युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड, २००७
    2. १६ – हार्दिक पंड्या विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, २०२५*
    3. १७ – अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, २०२५
    4. १८ – केएल राहुल विरुद्ध एससीओ, दुबई, २०२१
Outstanding show here from Tilak Varma & Hardik Pandya! 👊A power-packed 💯-run stand in just 41 balls! 💪 Updates ▶️ https://t.co/kw4LKLNSl3#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yL6upivyW7 — BCCI (@BCCI) December 19, 2025

 

पंड्याचे १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण

हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी स्फोटक खेळी खेळली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात पाच बाद २३१ धावांचा डोंगर रचला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय संघाचा डाव सुरू केला आणि सहाव्या षटकात पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. यावेळी देखील  कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट काहीच खास करू शकली नाही.७ धावा करून बाद झाला.  हार्दिक पंड्याने २५ चेंडूत ६३ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तर तिलक वर्माने ४२ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यंदये त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला.

हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबाद हार्दिक-तिलकची विस्फोटक खेळी! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य

 

Web Title: Ind vs sa 5th t20i hardik pandya scores the fastest half century in ahmedabad marathi cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 09:18 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news
  • Ind Vs Sa
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND vs SA, T20 World Cup 2026 : संजू की इशान? भारतीय संघासमोर सलामीसाठी पेच! सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार 
1

IND vs SA, T20 World Cup 2026 : संजू की इशान? भारतीय संघासमोर सलामीसाठी पेच! सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार 

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?
2

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

IND vs NZ 5Th 20 : भारताचा ग्रीनफील्ड स्टेडियमवर न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर! इशान-सूर्याची वादळी खेळी 
3

IND vs NZ 5Th 20 : भारताचा ग्रीनफील्ड स्टेडियमवर न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर! इशान-सूर्याची वादळी खेळी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.