
फोटो सौजन्य - indiancricketteam
Arshdeep singh Viral Video : भारताचा संघ सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाने तीन सामन्यांनंतर आघाडी घेतली आहे. पण टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. यामध्ये अर्शदीप सिंह याने 6 वाईड बाॅल टाकले होते. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी पराभव पत्करल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी गोलंदाजांच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्यांच्या गोलंदाजांच्या कामगिरीने त्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या टी-२० मध्ये टीकेचा सामना करणाऱ्या अर्शदीप सिंगनेही मॉर्केलची माफी मागितली आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला स्वस्तात बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त ११७ धावांवर सर्वबाद झाला. टीम इंडियाने केवळ तीन विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. यासह, भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. “मला आनंद आहे की गोलंदाज अशा प्रकारे परत आले,” असे बीसीसीआय टीव्हीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मॉर्केल म्हणाले.
“गेल्या सामन्यात, जेव्हा जेव्हा मी वाईड बॉल टाकत असे, तेव्हा कॅमेरा प्रशिक्षकाच्या (मोर्केल) चेहऱ्यावर जात असे जणू काही त्याने मला चुकीची रणनीती दिली आहे. मी मॉर्नची माफी मागू इच्छितो आणि कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर सतत जाऊ नये याची खात्री करू इच्छितो,” असे अर्शदीप व्हिडिओमध्ये म्हणाला. दुसऱ्या सामन्यात, अर्शदीपने सलग सहा वाईड चेडू टाकले होते त्यामुळे गंभीर देखील त्यावर संतापलेला दिसला. भारत सामना गमावला आणि गोलंदाजीच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तिसऱ्या टी-२० मध्ये, भारतीय गोलंदाजांनी चूक सुधारली आणि दक्षिण आफ्रिकेला स्वस्तात बाद केले.
दरम्यान, हर्षित राणा म्हणाला की त्याला अर्शदीपसोबत जोडीने गोलंदाजी करायला आवडते कारण डावखुरा गोलंदाज एका टोकापासून दबाव निर्माण करतो. “मला अर्शदीपसोबत गोलंदाजी करायला आवडते. तो दुसऱ्या टोकापासून दबाव निर्माण करतो, ज्यामुळे मदत होते. धर्मशाळेतील हा माझा पहिला सामना होता आणि गोलंदाजी करणे छान होते. हवामानाने खूप मदत केली,” तो म्हणाला.