
IND vs SA 1st T20: On-field controversy erupts with 'no-ball'! Jasprit Bumrah's historic wicket and umpire's decision...; Watch VIDEO
Jasprit Bumrah’s 100th T20 wicket controversy : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी२० सामाना ९ डिसेंबर रोजी कटकमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बूमराह टी२० मध्ये १०० विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. तथापि, पंचांच्या चुकीमुळे झालेल्या वादामुळे हा ऐतिहासिक क्षण बाजूला सारला गेला. या सामन्यात वाद निर्माण झाला. त्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.
हेही वाचा : IND vs SA 1st T20 : ‘यॉर्कर किंग’चा जागतिक क्रिकेटमध्ये कहर! ‘ही’ कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज
कटकमधील बाराबती स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला. ता सामन्यातील दुसऱ्या डावातील ११ व्या षटकात एक घटना घडली. १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची अवस्था आधीच ६/६८ झाली होती. तेव्हा सूर्यकुमार यादवने सामना लवकर संपवण्यासाठी जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू दिला.
११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, बुमराहने ऑफ स्टंपच्या बाहेर डेवाल्ड ब्रेव्हिसला एक शॉर्ट डिलिव्हरी टाकली आणि ब्रेव्हिसने चुकीचा फटका मारला आणि चेंडू कव्हरवर सूर्यकुमार यादवच्या हातात जाऊन विसवला. भारतीय संघाने या विकेट्सचा आनंद साजरा केला, परंतु रिप्लेमध्ये बुमराहचा पाय ऑन किंवा ऑफ लाईन असल्याचे दिसून आले. नियमांनुसार, हा चेंडू नो-बॉल होता.
JASPRIT BUMRAH COMPLETES 100 T20I WICKETS. pic.twitter.com/wGnRGBYwvT — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 9, 2025
ऑन-फिल्ड अंपायरकडून ब्रेव्हिसला थांबवण्यात आले असले तरी, थर्ड अंपायर केएन अनंत पद्मनाभन यांनी लगेचच आपला निर्णय दिला, चेंडू वैध घोषित केला आणि ब्रेव्हिसला बाद दिले. तथापि, समालोचकांना असे वाटले की तो नो-बॉल आहे. त्यानंतर, या विकेटचा व्हिडिओ व्हायरल झाला.
या विकेटसह जसप्रित बुमराहने अधिकृतपणे टी-२० मध्ये त्याचा १०० वा बळी पूर्ण केला. तथापि, फक्त तीन चेंडूंनंतर, त्याने केशव महाराजला आऊट करून त्याचा १०१ वा बळी मिळवला. यासह, तो भारतासाठी १०० टी-२० विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनला. अर्शदीप सिंगने ६९ सामन्यांमध्ये १८.३७ च्या सरासरीने १०७ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा : Ind Vs SA: 6, 6, 6, 6…हार्दिक पंड्याची धुव्वाधार खेळी, केला ‘महारेकॉर्ड’, कारनामा करणारा 4 था भारतीय फलंदाज
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ६ गडी गमावून १७५ धावा उभ्या केल्या. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने २८ चेंडूत शानदार नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ७४ धावाच करता आल्या. भारताने हा सामना १०१ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेण्यात यश मिळवले.