
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs South Africa : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पहिल्या डावामध्ये 159 धावांवर गुंडाळले आहे. पहिल्या डावामध्ये 55 ओव्हरचा खेळ झाला यामध्ये भारताच्या संघाने सर्व फलंदाजांना बाद करुन पहिला डाव 159 धावांवर संपवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या जेवणापर्यंत तीन विकेट गमावल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात आणखी पाच विकेट गमावल्या.
दक्षिण आफ्रिकेने एडेन मार्कराम आणि रायन रिकल्टन यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ५७ धावा जोडून चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर संघाला संघर्ष करावा लागला. भारतीय प्लेइंग इलेव्हनने सर्वांना आश्चर्यचकित केले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुरुवात चांगली केली पण त्यानंतर सर्व फलंदाजांना संघर्ष करावा लागला. या पहिल्या डावामध्ये जसप्रीत बुमराह याने संघासाठी 5 विकेट्स नावावर केले आहे.
Innings Break! 5⃣-fer for Jasprit Bumrah 🫡
2⃣ wickets each for Mohd. Siraj and Kuldeep Yadav 👏
1⃣ wicket for Axar Patel 👌 A magnificent bowling effort! Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Hkrb5nzbeZ — BCCI (@BCCI) November 14, 2025
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारताने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांवर गुंडाळले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहने पाच विकेट घेतल्या. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात भारताने दक्षिण आफ्रिकेला लवकर बाद केले. आता भारत पहिल्या डावात आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवेल. बुमराह व्यतिरिक्त, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलनेही एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करामने सर्वाधिक ३१ धावा केल्या, त्यानंतर विआन मुल्डरने २४, टोनी डी जियोर्गीने २४, रायन रिकल्टनने २३, काइल व्हेरेनने १६, सायमन हार्मरने ५, टेम्बा बावुमाने ३ आणि कॉर्बिन बॉशने ३ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स १५ धावांवर नाबाद राहिले. टीम इंडिया ही दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकून २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.