
सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे भारताच्या नावावर राहिला. यशस्वी जयस्वाल (३२ धावा) आणि केएल राहुल यांनी ४७ धावांची सलामीची भागीदारी करून भारताला स्थिर सुरुवात करून दिली. यशस्वी दुर्दैवाने धावबाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल क्रीजवर आला. पडिक्कल आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वाची शतकी भागीदारी केली. पडिक्कलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, तर राहुल ७७ धावांवर असताना दुखापतग्रस्त होऊन रिटायर्ड हर्ट झाला. कर्णधार शुभमन गिलने केवळ १६ धावा केल्या. पावसामुळे बाधित झालेल्या पहिल्या दिवशी भारताने फक्त दोन विकेट गमावल्या.
दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळावर मोठा परिणाम झाला. पहिले सत्र पावसामुळे रद्द झाले आणि दुसऱ्या सत्रात केवळ मर्यादित षटकेच टाकण्यात आली. दुसऱ्या दिवशी भारताने पहिली विकेट ऋषभ पंतच्या स्वरुपात गमावली. केशरा नुवान्थाने ३९ धावांवर पंतला पव्हेलियमध्ये पाठवले. पंत बाद झाल्यानंतर राहुल फलंदाजीसाठी परतला. परंतु, नुवान्थाने त्याला मोठी खेळी करता आली नाही. राहुलने १० चौकार आणि एका षटकारासह १७५ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या.
भारताने देवदत्त पडिक्कलच्या रूपाने आपली पाचवी विकेट गमावली. प्रभात जयसूर्याने पडिक्कलला स्टम्प आउट केले. पडिक्कलने १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २३० चेंडूंमध्ये शानदार १६७ धावा केल्या. रवींद्र जडेजाला १३ धावांवर केसरा नुवान्थाने त्याला बाद केले. त्यानंतर, ध्रुव जुरेल आणि मानव सुथार यांनी सातव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. जुरेलने ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६८ चेंडूंमध्ये ५१ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराजन ११ धावा आणि मानव सुथार २४ धावा करुन आठव्या आणि नवव्या विकेटच्या रुपात तंबूत परतले. डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या श्रीलंकेसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १०९ धावांत चार विकेट घेतले. केसरा नुवान्थाने तीन विकेट घेतले, पण भारताने पहिल्या डावात ४६० धावांची भक्कम धावसंख्या उभारली आहे.
भारत – यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
श्रीलंका – लाहिरू उदारा, निशान फर्नांडो, दिनेश चांदिमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो
Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात