Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: गॉल कसोटीत टीम इंडियाचा ‘स्पिन’ मास्टरप्लॅन! 3 डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरणार?

IND vs SL 1st Test Galle Team India Playing 11: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरु शकतो, असे संकेत संघाचे गोलंदाजी प्रशित्रक मॉर्न मॉर्केल यांनी दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 13, 2026 | 08:42 PM
IND vs SL 2nd Test Playing 11

IND vs SL 2nd Test Playing 11

Follow Us
Follow Us:
  • गॉल कसोटीत टीम इंडियाचा ‘स्पिन’ मास्टरप्लॅन
  • 3 डावखुरे फिरकीपटू मैदानात उतरणार?
  • संघ प्रत्येक परिस्थितीसाठी तयार..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिका शनिवारी १५ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघ या मालिकेतील दोन्ही कसोटी सामने जिंकण्याचा प्रयत्न करेल. गॉलमध्ये फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळण्याची शक्यता असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन संभ्रमात पडले आहे. गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांनी अद्याप तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांबाबत निर्णय घेतलेला नाही. संघ तीन वेगवान गोलंदाजांना संधी देईल की अंतिम ११ खेळाडूंमध्ये चार फिरकी गोलंदाजांचा समावेश केले जातील महत्वाचे ठरेल. परंतु, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी असे संकेत दिले आहेत की, पहिल्या कसोटीत भारत तीन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवू शकतो.

IND vs SL: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज! गॉलमध्ये पोहोचताच गिलसेनेचं दिमाखात स्वागत; श्रीलंकेविरुद्ध महामुकाबला

भारत ३ फिरकीपटूंसह मैदानात उतरणार

भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी असे संकेत दिले आहेत की, गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत तीन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवले जाऊ शकतात. कारण कुलदीप यादव, मानव सुथार आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे गोलंदाजीतील वेगवेगळे प्रकार आणि विकेट घेण्याची क्षमता आहे. कुलदीप आपल्या डावखुऱ्या मनगटी फिरकीने फलंदाजांना चकवण्याची क्षमता ठेवतो, जडेजाची अचूक गोलंदाजी सर्वोत्तम फलंदाजांनाही अडचणीत आणू शकते, तर सुथारची गोलंदाजी डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीच्या पारंपरिक शैलीची आठवण करून देते.

कुलदीपचा अनुभव खूप महत्त्वाचा

मॉर्केल माध्यमांना म्हणाले की, ‘आमच्यासोबत कुलदीप आहे आणि तो एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला वाटते की ते सर्व आपापल्या शैलीने वेगळे आहेत. मानव चेंडूला थोडा जास्त वळवतो, तर, जडेजा थोडा जास्त अचूक आहे, आणि मला वाटत नाही की तीन डावखुरे फिरकी गोलंदाज असणे ही आमच्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे.’

तीन फिरकी गोलंदाज खेळवणे हा योग्य निर्णय…

मॉर्केल पुढे म्हणाले की ‘जर या मैदानाचा इतिहास पाहिला गेला तर येथे सामने कसे खेळले गेले आहेत हे पाहता, मला वाटते की तीन फिरकी गोलंदाजांना संधी देणे हाच योग्य मार्ग आहे. आमच्या फिरकी गोलंदाजीचा विचार करता, हा एक खूप आक्रमक पर्याय आहे. पण खेळपट्टी पाहता, ती एक चांगली खेळपट्टी दिसते आणि माझा विश्वास आहे की कसोटी जसजशी पुढे जाईल, तसतसे त्यात काही बदल होतील. परंतु, हे कर्णधार शुभमन गिल विशिष्ट वेळी या गोलंदाजांचा कसा वापर करतो यावर अवलंबून असेल. पण कौशल्याच्या बाबतीत, त्या सर्वांमध्ये आमच्यासाठी २० विकेट घेण्याची क्षमता आहे.’

संघ प्रत्येक परिस्थितीसाठी तयार..

मॉर्केल यांनी सांगितले की, ‘संघाने सर्व प्रकारच्या परिस्थितींसाठी तयारी केली असून, अशा परिस्थितीत मानसिक क्षमता, दीर्घकाळ फलंदाजी करणे आणि योग्य ठिकाणी गोलंदाजी करणे महत्त्वाचे ठरेल. वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत मॉर्केल चिंतित दिसले नाहीत. ते म्हणाले की, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी देशांतर्गत स्तरावर कठीण परिस्थितीत भरपूर क्रिकेट खेळले आहे. येथे त्यांना, तीव्र उष्णता, आर्द्रता आणि कुकाबुरा चेंडूचा मऊपणा ही खरी आव्हाने असतील.’

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Web Title: Ind vs sl 1st test team india 3 left arm spinners galle test playing xi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Morne Morkel
  • Shubhman Gill
  • Sri Lanka cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
1

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’
2

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.