Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL Live: पडिक्कलची फिफ्टी, गिलनेही ठोकलं अर्धशतक! शतकी भागीदारीने श्रीलंकेची कोंडी; भारत १८० पार

IND vs SL 2nd test Devdutt Padikkal Shubman Gill Fifty: भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल शानदार फलंदाजी करत क्रिजवर टिकून आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 23, 2026 | 02:35 PM
IND vs SL 2nd test Devdutt Padikkal Shubman Gill Fifty

IND vs SL 2nd test Devdutt Padikkal Shubman Gill Fifty

Follow Us
Follow Us:
  • पडिक्कलची फिफ्टी अन् गिलचंही अर्धशतक
  • शतकी भागीदारीने भारत मजबूत
  • भारताची धावसंख्या १८० पार
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. आज (२३ ऑगस्ट) सामन्याचा पहिला दिवस आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने लंच ब्रेक पर्यंत २ विकेट्स गमावून ८८ धावा केल्या होत्या. कर्णधार शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल सध्या क्रिजवर शानदार फलंदाजी करत आहेत. देवदत्त पडिक्कलने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे. तर शुभमन गिलने देखील अर्धशतकी खेळी केली आहे.

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

देवदत्तची अर्धशतकी खेळी, शतकाच्या जवळ

भारताने दोन विकेट्स गमावून १५० हून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, देवदत्त पडिक्कलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने आतापर्यंत शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली आहे. पडिक्कल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने गॉल कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले होते. यानंतर, दुसऱ्या डावात त्याचे अर्धशतक हुकले आणि तो ४४ धावा करून बाद झाला. आता त्याने आणखी एक अर्धशतक झळकावले आहे. गॉल कसोटीत पडिक्कल सामनावीर ठरला होता.

गिलने पूर्ण केले नववे अर्धशतक

देवदत्त पडिक्कलच्या पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलनेही आपल्या कसोटी कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. भारताची धावसंख्या सध्या दोन विकेट्स गमावून १८४ आहे. गिल सध्या ५० धावांवर आणि पडिक्कल ६१ धावांवर खेळपट्टीवर आहे. या दोघांनी आता तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका लंच ब्रेक

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत भारताने ८८ धावांवर दोन विकेट्स गमावले होते. कर्णधार शुभमन गिल ११ धावांवर नाबाद राहिला, तर देवदत्त पडिक्कल १३ धावांवर नाबाद होता.

३७ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. दोन चौकार आणि एका षटकारासह ३३ चेंडूंमध्ये १८ धावा करून केएल राहुल बाद झाला. लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डिकवेलाने त्याचा झेल घेतला. भारताची दुसरी विकेट ६६ धावांवर पडली. यशस्वी जैस्वाल आसिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याने नऊ चौकारांसह ५३ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, सरांश जैन, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

श्रीलंका : लाहिरू उदारा, कामिल मिश्रा, पसिंदू सूर्यबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.

Hockey World Cup 2026: भारत-नेदरलँड्समध्ये ‘हायव्होल्टेज’ महामुकाबला! सामना कधी, कुठे अन् किती वाजता? जाणून घ्या

Web Title: Ind vs sl 2nd live test colombo shubman gill devdutt padikkal fifty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी
1

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
2

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

IND vs SL: भारत-श्रीलंका महामुकाबल्यात हवामानाचा ‘खेळ’! पाचही दिवस पावसाचं सावट; कोलंबो टेस्टपूर्वी Weather Forecast समोर
3

IND vs SL: भारत-श्रीलंका महामुकाबल्यात हवामानाचा ‘खेळ’! पाचही दिवस पावसाचं सावट; कोलंबो टेस्टपूर्वी Weather Forecast समोर

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल
4

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.