Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs Sl 2nd Test: शून्यावर कॅच सुटली अन् मिळालं जीवनदान! मग देवदत्त पडिक्कलने केली लंकेची धुलाई; सलग दुसऱ्या कसोटीत ठोकलं शतक

IND vs SL 2nd Test Devdutt padikkal Century: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ सुरु आहे. देवदत्त पडिकक्लने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 23, 2026 | 05:52 PM
IND vs Sl 2nd Test Devdutt padikkal Century:

IND vs Sl 2nd Test Devdutt padikkal Century:

Follow Us
Follow Us:
  • पडिक्कलचे शानदार शतक
  • सलग दुसऱ्या टेस्टमध्ये ठोकली सेंच्युरी
  • जडेजासोबत तुफानी भागीदारी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अंतिम सामना सध्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरु आहे. या महत्वाच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने सुरुवातीला के एल राहुलच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर, यशस्वी जैस्वाल तंबूत परतला. परंतु, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या देवदत्त पडिक्कल शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आहे.

IND vs SL: कोण आहे सारांश जैन? वयाच्या ३३व्या वर्षी मिळाली टीम इंडियात पदार्पणाची संधी

पडिक्कलचे शानदार शतक

भारताचा युवा स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरे कसोटी शतक ठोकले आहे. त्याने १६८ चेंडूंमध्ये आपले शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे शतकही आहे. पडिक्कलने १९३ चेंडूमध्ये ११७ धावा केल्या. यामध्ये १२ चौकारांचा समावेश होता. केशरा नुवांथाने त्याना बोल्ड करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी आलेल्या पडिक्कलने संयमी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. त्याने शुभमन गिलसोबत १०० धावांची भागिदारी केली. पडिक्कलने रवींद्र जडेजासोबत ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारीही केली आहे.

पडिक्कलने गॉल कसोटीच्या पहिल्या डावात १६७ धावा केल्या. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने गॉल कसोटीच्या दुसऱ्या डावात देखील म्हत्वपूर्ण ४४ धावा केल्या होत्या. आता त्याने कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात आणखी एक शतक झळकावले आहे. पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी आपला दावा मजबूत केल आहे. त्याने साई सुदर्शनचे कमबॅक कठीण केले आहे.

पंत दुखापतग्रस्त होऊन निवृत्त

भारताच्या डावाच्या ५८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पंतने लाहिरू कुमाराच्या शॉर्ट बॉलवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या हाताला लागला. त्यानंतर तो खूप वेदनेत असल्याचे दिसत होते. चेंडू त्याच्या मनगटाच्या हाडाला लागला होता. फिजिओ धावत आले आणि त्यांनी पंतच्या मनगटावर बर्फ लावला. त्याच्या मनगटाला टेपही बांधण्यात आला. काही वेळाने टेप काढण्यात आला. त्यानंतर पंतने पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. तो दुखापतग्रस्त होऊन निवृत्त (रिटायर्ड हर्ट) झाला. त्यानंतप अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आला.

शुभमन गिलही टी- ब्रेकनंतर ५० धावा करून बाद झाला. सलामीला आलेला केएल राहुल १८ धावा आणि यशस्वी जैस्वाल ४५ धावा करून परतला. सध्या ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. भारताने ४ विकेट्स गमावून २८९ धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, सरांश जैन, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

श्रीलंका : लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पसिंदू सूर्यबंदरा, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.

AUS vs BAN: 11 तास, 30 विकेट्स… Mitchell Starc समोर बांग्लादेश गारद! दोन दिवसांतच खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा डावाने दणदणीत विजय

Web Title: Ind vs sl 2nd test devdutt padikkal scores second consecutive century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Century
  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.