
श्रीलंकेचा केला 1-0 ने पराभव
दोन वर्षांची दीर्घ प्रतीक्षा आणि निराशाजनक कामगिरी केल्यानंतर अखेर पाकिस्तानने विजयाची चव चाखली आहे. . गेल्या दोन वर्षांपासून एकही टेस्ट सिरीज न जिंकणाऱ्या पाकिस्तानने अखेर श्रीलंकेला पराभूत करत सिरीज जिंकली आहे. पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 8 विकेट्सने पराभव केला आहे. तर पहिला सामना अनिर्णित राहिला होता.
पाकिस्तानकडे असले कसले खेळाडू? Babar Azam कडून 41 इनिंगमध्ये एकही शतक नाही; पण…
पाकिस्तानच्या विजयाचा खरा शिल्पकार वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास ठरला आहे. त्याने भेदक आणि प्रभावी गोलंदाजी करत त्याने श्रीलंकेची दाणादाण उडवले. मोहम्मद अब्बासला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ तसेच ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अखेर पाकिस्तानने विजय प्राप्त केला आहे. पाकिस्तानने आपली शेवटची टेस्ट सिरीज 2024 मध्ये जिंकली होती.
Congratulations to Team Pakistan 🇵🇰🏏 Pakistan beat Sri Lanka by 8 wickets in the 2nd Test in Rawalpindi.
🇱🇰 Sri Lanka: 98 & 316
🇵🇰 Pakistan: 325 & 90/2 https://t.co/MPqNWad7mI — Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) November 20, 2026
श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 316 रन्स वर ऑल आउट झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघापुढे दूसरा सामना जिंकण्यासाठी केवळ 90 रन्सचे टार्गेट होते. पाकिस्तानने चौथ्या दिवशी आक्रमक खेळ करत केवळ 13 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केले आणि सिरीज आपल्या नावावर केली. या डावात कर्णधार बाबर आझम मैदानात खेळण्यासाठी उतरला नाही.
रावळपिंडी कसोटीच्या सुरुवातीला पाकिस्तान कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय अगदी बरोबर ठरला. पहिल्या डावात श्रीलंकेची फलंदाजी केवळ 98 रन्सवर ऑल आउट झाली. मोहम्मद अब्बास, रझाउल्ला आणि आमिर जमाल या तिघांनी प्रत्येकी ३-३ बळी घेत श्रीलंकेचा डाव गुंडाळला. कुसल मेंडिस आणि सोनल दिनुशा यांचा अपवाद वगळता श्रीलंकेचे इतर फलंदाज अपयशी ठरले.
Ans: पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.
Ans: पाकिस्तानच्या संघाने तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली आहे.