Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt

Viral Video: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी लाहिरू कुमारच्या बाउन्सरमुळे जखमी झालेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी शानदार पुनरागमन केले आणि तशाच बॉलवर सिक्स मारत सोलार पॅनल तोडले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 24, 2026 | 03:59 PM
ऋषभ पंतची कमाल, सोलार पॅनेलच तोडले (फोटो सौजन्य - Instagram)

ऋषभ पंतची कमाल, सोलार पॅनेलच तोडले (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • ऋषभ पंतचा कोलंबमोध्ये जलवा 
  • सोलार पॅनेलवर सिक्स मारत मनसुबे केले व्यक्त 
  • नशीबानेही दिली साथ 
Viral Video: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय चाहत्यांना एक चिंताजनक बातमी मिळाली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारचा एक भेदक बाउन्सर थेट ऋषभ पंतच्या मनगटावर लागला. मात्र, दुसऱ्या दिवशी पंत क्रीजवर परतला आणि मैदानावर त्याला घाबरवणे किती कठीण आहे हे त्याने सिद्ध करून दाखवले. पंतने लाहिरूला त्याच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले, एक असे प्रत्युत्तर जे लाहिरू आयुष्यभर लक्षात ठेवेल.

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त

त्याच बाउन्सरवर तब्बल ९५ मीटर लांब षटकार

💥 HUGE SIX! 🇮🇳🏏 Rishabh Pant absolutely smashed a massive six against Sri Lanka in the 2nd Test! 😱🔥 The ball flew into the stands and broke a solar panel at the stadium. ☀️💥 That’s not just a six… that’s a power shot! 💪😂#INDvsSL #RishabhPant pic.twitter.com/zSuBR1XSIa — Sunanda Acharya (@Sunanda_Iam) August 24, 2026

दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना, लाहिरू कुमारने पुन्हा एकदा लेग साईडला एक भेदक बाउन्सर टाकून पंतला लक्ष्य केले, पण यावेळी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज पूर्णपणे तयार होता. पंतने क्षणात आपली जागा घेतली आणि चेंडू फाईन लेगवरून खेचून थेट एसएससी स्टेडियमच्या छतावर पाठवला. तो षटकार इतका प्रचंड होता की तो स्टेडियमच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेला. त्या षटकाराचे अंतर ९५ मीटर होते.

चौथ्या पंचांना नवीन चेंडूंचा बॉक्स आणावा लागला. पंतच्या धोकादायक शॉट नंतर चेंडू गायब झाला, त्यामुळे खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. सामना पुन्हा सुरू व्हावा यासाठी चौथ्या पंचांना नव्या चेंडूंचा बॉक्स घेऊन तात्काळ मैदानावर परतावे लागले. पंतच्या स्फोटक पुनरागमनाने मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक आणि समालोचक रोमांचित झाले. या षटकाराने एसएससी स्टेडियमच्या छतावरील सोलर पॅनलही तोडले.

पंतने गोलंदाजाला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले

ऋषभ पंतच्या निर्भय फलंदाजीने आपल्या आक्रमक शैलीने कोणत्याही गोलंदाजाला चोख प्रत्युत्तर देण्याची त्याची क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली. आदल्या दिवशी ज्या गोलंदाजाने त्याला जखमी केले होते, त्याच गोलंदाजाचा चेंडू मैदानाबाहेर पाठवून पंतने केवळ आपला इरादाच स्पष्ट केला नाही, तर सामन्यात भारतीय संघाची स्थितीही मजबूत केली.

Colombo Weather: कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता, कसे राहील तासातासाला हवामान

नशीबाचीही साथ 

ऋषभ पंतची निर्भय फलंदाजी कसोटी मालिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळाली. देवानेही त्याला साथ दिली. ९४ व्या षटकात, असिता फर्नांडोने तिसऱ्या चेंडूवर पंतला बाउन्सर टाकला. पंतने तो शॉट खेळला नाही आणि चेंडू त्याच्या खांद्याला लागला. त्यानंतर पंतने बाजूला सरकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू उसळून यष्टींवरून गेला. चेंडू यष्टींना लागेल असे वाटले, पण तो पलीकडच्या यष्टींच्या अगदी जवळ जाऊन पडला. यामुळे श्रीलंकेचा संघ आश्चर्यचकित झाला आणि यावर पंत मात्र मनसोक्त हसला. 

Web Title: Ind vs sl colombo test viral video rishabh pant hits 95m 6 broke solar panel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई
1

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई

Yashasvi Jaiswal: असिथा फर्नांडोसोबतच्या वादावर यशस्वीचा पलटवार; एका कमेंटने सोशल मिडिया हादरला, ‘जशास तसं उत्तर देऊ…’
2

Yashasvi Jaiswal: असिथा फर्नांडोसोबतच्या वादावर यशस्वीचा पलटवार; एका कमेंटने सोशल मिडिया हादरला, ‘जशास तसं उत्तर देऊ…’

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त
3

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त

Colombo Weather: कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता, कसे राहील तासातासाला हवामान
4

Colombo Weather: कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता, कसे राहील तासातासाला हवामान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.