Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाची कसोटी परीक्षा! हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? पाहा संपूर्ण आकडेवारी

IND VS SL Test Head To Head Records: भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या मालिकेत कोणाचे पारडे जड असणार आहे, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 02:14 PM
IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाची कसोटी परीक्षा! हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? पाहा संपूर्ण आकडेवारी
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेत टीम इंडियाची कसोटी परीक्षा
  • हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड?
  • श्रीलंकेचा शेवटचा दौरा २०१७ मध्ये झाला
IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेला रवाना झाली आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल येथे, तर दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवला जाईल. भारतीय संघ जवळपास नऊ वर्षांनंतर श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत आपला प्रभावी विक्रम कायम ठेवू शकेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND vs SL: क्रिकेटविश्वात Team India चा नवा विक्रम! Shubman Gill च्या नेतृत्वाखाली भारत करणार ऐतिहासिक कामगिरी

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण ४६ कसोटी सामने खेळले गेले आहे. त्यापैकी भारतीय संघाने २२, तर श्रीलंकन ​​संघाने केवळ ७ सामने जिंकले आहेत. उर्वरित १७ सामने अनिर्णित राहिले आहेत. आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताचेच वर्चस्व नेहमीच राहिले आहे.

श्रीलंकेने भारताविरुद्धची शेवटची कसोटी मालिका २००८ मध्ये जिंकली होती. त्या तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाने भारताला २-१ ने पराभूत केले होते. त्यावेळी श्रीलंकेचे कर्णधारपद महेला जयवर्धनेकडे, तर भारताचे कर्णधारपद अनिल कुंबळेकडे होते. श्रीलंकेने भारताविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना २०१५ मध्ये जिंकला होता.

२००८ च्या पराभवानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात सहा कसोटी मालिका खेळल्या गेल्या असून, त्यापैकी भारताने पाच मालिका जिंकल्या आहेत, तर श्रीलंकेत झालेली २०१० ची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.

श्रीलंकेचा शेवटचा दौरा २०१७ मध्ये झाला

भारतीय कसोटी संघाने शेवटचा श्रीलंका दौरा नऊ वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेच्या आपल्या शेवटच्या दौऱ्यात ३-० ने दमदार विजय मिळवला होता. यापूर्वी, २०१५ मध्ये, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला २-१ ने पराभूत केले होते. भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेत २४ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी ९ सामने जिंकले आहेत आणि ७ गमावले आहेत. याशिवाय, आठ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

बुमराह मालिकेतून बाहेर

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह या महत्त्वपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीला संघात स्थान देण्यात आले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. त्यातच बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भारतीय संघ:

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी

Duleep Trophy 2026: नॉर्थ झोन संघ जाहीर; Arshdeep Singh- Anshul Kamboj ला संघात स्थान, जम्मू-काश्मीरच्या खेळाडूकडे कर्णधारपद

Web Title: Ind vs sl test series team india sri lanka test head to head record shubman gill wtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Jasprit Bumrah
  • Shubhman Gill
  • Sri Lanka
  • Test Match

संबंधित बातम्या

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
1

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.