भारतीय संघाने आतापर्यंत ५९९ कसोटी सामने खेळले असून, गॉल येथे श्रीलंकेविरुद्धचा सामना हा त्यांचा ६०० वा सामना असेल. भारताने स्वातंत्र्यापूर्वीच आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिला सामना १९३२ मध्ये खेळला गेला होता. त्यावेळी सी. के. नायडू हे भारताचे कर्णधार होते. तेव्हापासूनचा प्रवास स्वतःच ऐतिहासिक राहिला आहे. १९३२ पासून अनेक कसोटी कर्णधारांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. परंतु, आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एका नवीन विक्रमाची नोंद होणार आहे.
Capturing smiles and creating travel memories on the way to Colombo 😁🎞️#TeamIndia have arrived in Sri Lanka 🛬#SLvIND pic.twitter.com/TuRFOW4gIw — BCCI (@BCCI) August 5, 2026
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त दोन संघांनी ६०० कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंडने आतापर्यंत सर्वाधिक १,०९७ कसोटी सामने खेळले आहेत. हा विक्रम गाठणे इतर कोणासाठीही जवळपास अशक्य आहे. इंग्लंडने आपला पहिला कसोटी सामना १८७७ साली खेळला होता. तर,ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानेही आपला पहिला कसोटी सामना १८७७ मध्येच खेळला होता. तेव्हापासून या संघाने ८८२ कसोटी सामने खेळले आहेत.
भारताने आपला पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळला. संघाने एकूण ५९९ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात भारताने १८६ कसोटी सामने जिंकले असून १८८ गमावले आहेत. २२४ सामने अनिर्णित राहिले असून, केवळ एक सामना ड्ऱॉ राहिला आहे.
१५ ऑगस्ट रोजी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया आणि श्रीलंकन संघ आमनेसामने येतील, तेव्हा उत्साह शिगेला पोहोचेल. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग म्हणून खेळवली जाणार असल्याने ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची ठरणार आहे. या पाच दिवसीय सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय; लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंग निर्दोष, विनेश फोगट संतप्त, म्हणाली…






