Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय

India Beat Sri lanka in warm up match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनला धूळ चारली आणि ६ विकेट्सने सामना जिंकला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 09, 2026 | 07:32 PM
IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय
Follow Us
Follow Us:
  • पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर
  • पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय
  • लंका चारही मुंड्या चीत
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन दिवसाच्या सराव सामन्याला ७ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. कोलंबो येथील क्रिकेट क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. भारतीय क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत श्रीलंका क्रिकेट इलेव्हनवर दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेने २०० धावांवर आपला डाव घोषित करून पाहुण्या संघासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने हे लक्ष्य गाठून सामना जिंकला.

क्रिकेटमधून निवृत्ती, पण कमाई सुरूच! MS Dhoni ला BCCI कडून किती मिळते पेन्शन?

यजमान श्रीलंकेचा भारताला आव्हान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने दमदार सुरुवात केली. सलामीवीर निशन मदुष्काने ६६ धावांची वेगवान खेळी केली, तर रविंदू रसंथाने ७१ धावांची संयमी खेळी केली. कर्णधार सोनल दिनुशानेही मधल्या फळीत ५२ धावांचे मोलाचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, ज्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने ९० षटकांत आठ विकेट्स गमावून ३६३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.

देवदत्त पडिक्कलचे शानदार शतक अन टीम इंडियाचे कमबॅक

भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही, सलामीवीर यशस्वी जैस्वाल खाते न पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर केएल राहुलने डाव सावरला. मात्र. देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर येऊन तुफान फटकेबाजी केली. पडिक्कलने १८ चौकारांसह नाबाद १४२ धावा केल्या. त्याला अष्टपैलू रवींद्र जडेजाची साथ मिळाली, जडेजाने ६३ धावा केल्या. खालच्या फळीत, मानव सुथारच्या ४१ धावा आणि गुरनूर ब्रारच्या १८ चेंडूंतील ताबडतोब ३६ धावांच्या जोरावर भारताने ९० षटकांत ६ विकेट्स गमावून ३५७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.

श्रीलंका इलेव्हनचा दुसरा डाव

दुसऱ्या डावात श्रीलंका इलेव्हनसाठी निशान मदुशंकाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७३ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या आणि तो दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. अंजला बंदाराने ३५ धावा, तर निपुण धनंजयाने ४६ धावा केल्या. भारताकडून गुरनूर ब्रार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. श्रीलंकेने ४५ षटकांत ६ विकेट्स गमावून २०० धावा केल्या आणि आपला दुसरा डाव घोषित केला. त्यांनी भारतासमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य ठेवले.

सराव सामन्यात भारताचा दमदार विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अवघ्या ४६ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. दुखापतीतून परतलेल्या कर्णधार शुभमन गिलनेही ४४ धावांचे योगदान दिले. अखेरीस, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने फलंदाजीत शानदार कामगिरी करत अवघ्या १५ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३२ धावा ठोकल्या आणि ४५ षटकांत ४ विकेट्स गमावून २१४ धावा केल्या. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला.

‘कोणालाही बळीचा बकरा बनवायचं…’; दुखापतग्रस्त खेळाडूंवर VVS Laxman यांचे सडेतोड उत्तर, ब्रॉन्को टेस्टवरही स्पष्ट केली भूमिका

Web Title: Ind vs sl warm up match india win by 6 wickets padikkal century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Mohammed Siraj
  • Shubhman Gill
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.