फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरूध्द श्रीलंका सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग : श्रीलंकामध्ये सध्या दक्षिण आफ्रिका भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ट्राय सिरीज सुरू आहे. या तीन संघांमध्ये सहा सामने आतापर्यंत खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहेत तर श्रीलंकेच्या संघाने चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त एक सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाला त्यामुळे संघ या मालिकेच्या फायनल मधून बाहेर झाला आहे.
मालिकेमध्ये श्रीलंका आणि भारत या दोन संघाने सर्वाधिक सामन्यात विजय मिळाल्यामुळे हे दोन्ही संघ आता फायनलमध्ये लढणार आहेत आणि त्यानंतर या सिरीजचा विजेता घोषित केला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका ट्राय सिरीजचा फायनलचा सामना 11 मे रोजी खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणारा एकदिवसीय ट्राय सिरीजच्या फायनलच्या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला कधी आणि कुठे पाहता येणे या संदर्भात आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत.
या सिरीजचा शेवटचा सामना भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळवण्यात आला होता हा सामना भारताच्या संघाने 23 धावांनी जिंकला आहे. तर मालिकेमध्ये श्रीलंके विरुद्ध दोन सामन्यात लढत झाली यामध्ये एक सामना भारताचे संघाने जिंकला होता तर दुसरा सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना नक्कीच महत्त्वाचा असणार आहे.
मे महिन्यात IPL 2025 सुरू होणार नाही! चाहत्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार, वाचा सविस्तर माहिती
भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजता होणार आहे तर या सामन्याचे नाणेफेक सकाळी सामन्याच्या अर्ध्या तासा आधी म्हणजेच साडेनऊ वाजता होणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणारा प्रेक्षकांसाठी निराशाजनक माहिती म्हणजेच भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामधील महिला एकदिवसीय ट्राय सिरीजचे प्रक्षेपण भारतामध्ये केले जाणार नाही. पण या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही मोबाईल मध्ये पाहू शकता. श्रीलंका महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यामध्ये एक दिवसीय ट्राय सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲप किंवा वेबसाईटवर पाहू शकता. ॲप वर किंवा लाईफ स्विमिंग पाहण्यासाठी तुम्हाला त्याचे भारतीय संघाचा सामने पाहण्यासाठी 49 रुपयाचे सबस्क्रीप्शन घेणे गरजेचे आहे.