फोटो सौजन्य - X
अंबाती रायडूचे स्पष्टीकरण : भारताचा माजी क्रिकेट खेळाडू अंबाती रायडू नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत पाहायला मिळाला आहे. आयपीेएलमध्ये देखील तो जेव्हा काॅमेंट्री करतो तेव्हा तो बऱ्याचदा केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत पाहायला मिळाला आहे. आता सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले आहे. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेट खेळाडू अंबाती रायडूचे वक्तव्य चर्चेच राहिले आणि त्यामुळे त्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते, आता त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
डोळ्यासाठी डोळा हा निर्णय संपूर्ण जगाला आंधळा करतो…. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले तेव्हा ही ओळ माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिली होती. रायुडूने हे पोस्ट करताच चाहते संतापले आणि त्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. तथापि, नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि आता त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणतो की त्याच्या पोस्टचा गैरसमज झाला आहे.
रायुडूने शुक्रवारी रात्री ९ मे रोजी एका पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिले, ज्यात लिहिले आहे की, ‘सीमेवरील परिस्थितीबद्दल मी अलिकडेच केलेल्या माझ्या टिप्पणीचे स्पष्टीकरण देऊ इच्छितो, ज्याचा गैरसमज झाला आहे. यावर माझा असा कोणताही हेतू नाही असे त्याने स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, ‘या संवेदनशील काळात, मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या निर्णायक नेतृत्वाखालील आपल्या सरकारसोबत उभा आहे , जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कठोर कारवाई करत आहे .’ पुढे तो असाही म्हणाला आहे की मी आपल्या शूर भारतीय सैन्यासोबत खंबीरपणे उभा आहे आणि माझ्या देशामधील नागरिकांच्या भावनांमध्ये मनापासून सहभागी आहे.
I’d like to clarify a recent comment I made regarding the border situation, which appears to have been misunderstood. That was never my intention, and I would like to set the record straight .
In these sensitive times, I stand with our government—under the decisive leadership of…
— ATR (@RayuduAmbati) May 9, 2025
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. तथापि, यानंतर, ८ मे च्या रात्री, पाकिस्तानने आपले नापाक हेतू पूर्ण करण्यासाठी सीमेवरील भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्य सतत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानने ड्रोनपासून क्षेपणास्त्रांपर्यंत अनेक हल्ले केले, पण भारताने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याची नावे घेतली. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.