
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Suryavanshi Century : आशिया कप 2025 चे जेतेपद भारताच्या संघाने जिंकल्यानंतर आता U19 आशिया कप 2025 सुरु झाला आहे. विश्वचषकाआधी भारतीय अंडर 19 संघाची ही महत्वाची स्पर्धा आहे. टीम इंडियासाठी हे महत्वाचे सामने आहेत. U19 आशिया कप 2025 चा आजपासून भारतीय संघाचा स्पर्धमध्ये शुभारंभ सुरु झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा यूएईविरुद्ध खेळवला जात आहे. या पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा युवा फलंदाज वैभव सुर्यवंशी याने त्याच्या बॅटने आणखी एकदा जादू दाखवली आणि कमाल मैदानावर केली आहे.
आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे हा फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने 4 धावा केल्या आणि स्वतात बाद झाला. भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर वैभव सुर्यवंशी आणि आरोन गोरगे या दोघांनी कमालीची भागिदारी केली आणि भारतीय संघाचा खेळ सांभाळला. वैभव सुर्यवंशी याने त्याच्या खेळीमध्ये 9 षटकार आणि 5 चौकार मारले आणि भारताच्या संघाला दमदार सुरुवात या स्पर्धमध्ये करुन दिली आहे. त्याने 58 चेंडूमध्ये 101 धावा केल्या आहेत.
💯 up! Sooryavanshi is dominating another tournament! Watch India take on UAE in U19 #AsiaCup, LIVE on #SonyLIV and #SonySportsNetwork TV channels pic.twitter.com/4cdFDo0Msx — Sony LIV (@SonyLIV) December 12, 2025
वैभवने ५६ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. तो द्विशतक झळकावण्याच्या मार्गावर होता, परंतु त्याचे स्वप्न २९ धावांनी भंगले. १७१ धावा करून वैभव पॅव्हेलियनमध्ये परतला. अंडर-१९ आशिया कपमध्ये वैभवने शानदार सुरुवात केली.
वैभव सुर्यवंशी याने भारताच्या संघासाठी शतक ठोकल्यानंतर आरोन गोरगे याने देखील अर्धशतक ठोकले आणि वैभव सुर्यवंशी याला चांगली साथ दिली आहे. संघाने पहिल्याच सामन्यामध्ये यूएईवर दबदबा दाखवला आहे. त्याचबरोबर वैभव सुर्यवंशी आणि आरोन गोरगे या दोघांमध्ये 150 हून अधिक धावांची भागिदारी झाली आहे. संघाच्या या कामगिरीचा फायदा त्यांना विश्वचषकामध्ये होईल.
IND vs SA : मी हे करायला हवे होते… कॅप्टन सूर्यकुमारने कबूल केली चूक, शुभमन गिलवर केले विधान
या स्पर्धमध्ये भारतीय संघाचे तीन लीग सामने होणार आहेत. पहिला सामना आज यूएईविरुद्ध खेळवला जात आहे. त्यानंतर भारताचा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा 14 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताच्या संघासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान असणार आहे. तर लीग स्टेजमध्ये भारताचा शेवटचा सामना हा मलेशिया विरुद्ध खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने भारताच्या संघासाठी महत्वाचे आहेत. आता विश्वचषकाआधी भारतीय संघ कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.