
Under-19 World Cup 2026: Vaibhav Suryavanshi's express innings! Scored a half-century in 24 balls against Zimbabwe; created history.
IND vs ZIM, ICC Under-19 World Cup 2026 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चा 30 वा सामना भारत १९ वर्षांखालील आणि झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळला जात आहे. बुलावायो येथे खेळल्या जात असेलल्या या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या घातक फलंदाजीने इतिहास रचला आहे. त्याने या सामन्यात केवळ २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. यासह तो आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो भारताचा संयुक्त पहिला खेळाडू बनला आहे.
यापूर्वी, हा विक्रम फक्त सध्याचा कर्णधार आयुष म्हात्रे यांच्या नावावर जमा होता. युष म्हात्रेने लीग टप्प्यात न्यूझीलंडविरुद्ध २४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तथापि, आज (२७ जानेवारी) वैभवने झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघाविरुद्ध २४ चेंडूत अर्धशतक झळकावून म्हात्रेंच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. दोन्ही फलंदाजांनी १९ वर्षांखालील विश्वचषकात प्रत्येकी २४ चेंडूत देशासाठी अर्धशतके झळकावली आहेत. तथापि, सूर्यवंशी ३० चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले.
विल मलाजचुकने सर्वात जलद अर्धशतक झळकावले असून लेखनापर्यंत, विल मलाजचुकने २०२६ च्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने जपानविरुद्ध फक्त २३ चेंडूत अर्धशतक झळकावून सर्वांना आश्चर्यचकित केले.
तथापि भारताने या सामन्यात चांगली सुरुवात केली. आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांनी संघाला ४.१ षटकातच ४४ धावांची सलामी दिली. दरम्यान, आरोन जॉर्ज २३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत डाव सावरला. या दोघांनी ६६ धावा जोडल्या. आयुष म्हात्रे २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी अर्धशतक करून माघारी परतला. तसेच वेदांत त्रिपाठी १५ धावा करून बाद झाला. भारताच्या १३० धावांवर ४ विकेट्स गेल्या होत्या. हे वृत्त लिहीपर्यन्त भारताच्या ३५.२ षटकात २४२ धावा झाल्या असून विहान मल्होत्रा ३६ धावा तर अभिज्ञान कुंडू ६१ धावांवर खेळत आहे.
झिम्बाब्वे अंडर-19 प्लेइंग 11: नॅथॅनियल हलाबांगना (यष्टीरक्षक), ध्रुव पटेल, कियान ब्लिग्नॉट, वेबस्टर मधिधी, ताकुडझ्वा माकोनी, लिरॉय चिवौला, सिम्बराशे मुडझेनगेरे (कर्णधार), ब्रँडन सेंजेरे, मायकेल ब्लिग्नॉट, ततेंडा चिमुगोरो, पानश मागोरो.
भारत अंडर-19 प्लेइंग 11: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, कनिष्क चौहान, आरएस अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन.