
IND vs WI 1st ODI
तिरुवनंतपुरमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नेहमीच फायदेशीर राहिली आहे. या खेळपट्टीवर सुरुवातीच्या टप्प्यात वेगवान गोलंदाजांना साथ मिळते, तर मधल्या षटकांमध्ये धावा करणे सोपे होते. सुरुवातील गोलंदाज फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करु शकतात. परंतु फलंदाज क्रीजवर टीकला तर धावांचा पाऊस पडू शकतो. तसेच, मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल, ज्यामुळे फलंदाजांना सातत्याने मोठे शॉट्स खेळणे कठीण होईल. येथे जानेवारी महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटचा सामना खेळला गेला होता. या सामन्यात दोन्ही संघांनी २७१ आणि २२५ धावा केल्या होत्या.
भारताने शेवटची एकदिवसीय मालिका जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान खेळली होती, ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी वेस्ट इंडिज मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. वेस्ट इंडिजने २४ वर्षांत भारतात एकही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. वेस्ट इंडिजने भारतात शेवटची एकदिवसीय मालिका २००२ मध्ये जिंकली होती, तेव्हा कार्ल हूपर कर्णधार होता. सध्या शाई होप वेस्ट इंडिजचा कर्णधार आहे. वेस्ट इंडिजने मायदेशात भारताविरुद्धची शेवटची द्विपक्षीय एकदिवसीय मालिका २००६ मध्ये जिंकली होती. तेव्हापासून, दोन्ही संघांमधील १३ मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत १४२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी वेस्ट इंडिजने ७२, तर भारताने ६४ सामने जिंकले आहेत. चार सामने अनिर्णित राहिले आणि दोन बरोबरीत सुटले.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स.