
Shubman Gill After Losing 3rd ODI against WI
पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, ‘आमच्यासाठी अनेक गोष्टी चांगल्या घडल्या. आमच्या संघाला काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. मी माझ्या संघाच्या धावसंख्येवर खूप समाधानी होतो. आम्हाला माहीत होते की, सामना अंतिम चेंडू पर्यंत जाईल. त्यामुळे कुलदीपने शेवटपर्यंत काही षटके टाकावीत अशी माझी इच्छा होती. आमचे क्षेत्ररक्षण अधिक चांगले होऊ शकले असते.’ गिल भारतीय संघाच्या गोलंदाजीवर आणि क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
गिल पुढे म्हणाला की, ‘डेथ बॉलिंगच्या बाबतीतही, मला वाटतं की कधीकधी आपण आक्रमण करत आहोत की बचाव करत आहोत, हे आपल्या पूर्णपणे लक्षात येत नाही, विशेषतः जेव्हा आपण शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करत असतो. अशा सामन्यात, जर प्रतिस्पर्धी संघाने पाच-सहा विकेट गमावल्या असतील, तर क्षेत्ररक्षण कसे लावावे याबद्दल तुम्हाला कधीच पूर्ण खात्री नसते. आपण डेथ बॉलिंग खूप लवकर सुरू करत आहोत की मधल्या षटकांप्रमाणेच गोलंदाजी करत आहोत? मला वाटतं की ही काही अशी क्षेत्रं आहेत जिथे आपल्याला निश्चितपणे सुधारणा करण्याची गरज आहे.’
प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ विकेट्स गमावून ३५१ धावा केल्या. रोहित शर्माने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ चेंडूंमध्ये ९२ धावांची शानदार खेळी केली. ऋतुराज गायकवाडनेही ६९ चेंडूंमध्ये ५७ धावा करून अर्धशतक झळकावले. त्यानंतर केएल राहुलने १० चौकार आणि ४ षटकारांसह ८७ चेंडूंमध्ये १२९ धावा करत उत्कृष्ट फलंदाजी केली. राहुलने या सामन्यात आपल्या १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. नमंधिरनेही २१ चेंडूंमध्ये ३० धावांची खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने शानदार कामगिरी केली. सलामीवीर आणि कर्णधार शाई होप शेवटपर्यंत टिकून राहिला, त्याने १४३ चेंडूंचा सामना करत १७ चौकार आणि ३ षटकारांसह शानदार १६२ धावा केल्या. अमीर जांगूने देखील ५६ चेंडूंमध्ये ६७ धावा करून अर्धशतक झळकावले. कीमो पॉलनेही ३५ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. वेस्ट इंडिजने ४८.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ५ विकेट्स राखून सामना जिंकला.