
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज तिसरा सामना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४ धावांवर शुभमन गिल आणि विराट कोहली बाद झाले आणि नक्की पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा कोणालाच अंदाज येऊ शकला नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने केवळ २८ धावा केल्या. मात्र हिटमॅन रोहित शर्माच्या ९२ धावा आणि केएल राहुलच्या नाबाद १२९ धावांच्या आधारावर संघाने ७ गडी गमावून ३५१ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला ३५२ धावांचे आव्हान दिले, जे संघाने पूर्ण करत इज्जत राखली. शे होपने नाबाद १६२ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजचा मान राखला.
भारताची शेवटच्या षटकात कमालीची कामगिरी
भारतीय संघाने शेवटच्या १० षटकांत १०५ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने आधीच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आजचा विजय म्हणजे या मालिकेत निर्भेळ विजय असेच म्हणावे लागेल. क्लीन स्वीप देत भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवले. कर्णधार शे होपने वेस्ट इंडिजकडून कमालीची खेळ करत शतक नोंदवले. सलग दुसऱ्या सामन्या होपने चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि विजय खेचून आणला.
रदरफोर्डची विकेट लाटली, पंचाच्या निर्णयावर नाखुष
वेस्ट इंडिजने २०६ धावांवर आपली तिसरी विकेट गमावली. शेर्फेन रदरफोर्ड २५ चेंडूंमध्ये २४ धावा करून बाद झाला. नमन धीरने त्याला यष्टीरक्षक लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. मात्र, चेंडू बॅटला लागलाच नव्हता असे वाटल्याने तो पंचांच्या निर्णयावर नाराज होता. यावर सर्व समालोचकांचंदेखील हेच मत होतं की, तिसऱ्या पंचांनी निर्णय घेण्यास घाई केली.
पॉल आणि होपची भागीदारी गुरनूरने मोडली
भारताविरूद्ध कर्णधार शे होप आणि किमो पॉलची भागीदारी गुरनूर ब्रारने मोडीत काढली. तोपर्यंत भारताला वेस्ट इंडिजचा संघ शेवटच्या सामन्यात मात देणार अशीच स्थिती होती. ६० चेंडूंमध्ये ८१ धावांची गरज असताना पॉलची विकेट गेली आणि त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाला गळती लागली. एका बाजूने शे होपने वेस्ट इंडिजच्या आशा तग धरून ठेवल्या होत्या. शेवटच्या काही षटकांमध्ये वेस्ट इंडिजचा खेळ रोखला जातो. तिन्ही सामन्यांमध्ये हे दिसून आले आहे. मात्र संधीची वाट पाहत संघाने विजय मिळवला.
शुभमन गिलचा या मैदानावर पहिलाच सामना
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल या मैदानावर प्रथमच एकदिवसीय सामना खेळला मात्र त्याने चांगली कामगिरी दाखवली नाही. त्याने या मैदानावर कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असल्यामुळे तो या स्टेडियमशी परिचित असला तरी, हा त्याचा पहिलाच एकदिवसीय सामना होता. पण त्याने चाहत्यांची निराशा केली. तर के एल राहुलने केलेली १२९ धावांची खेळी व्यर्थ केली. कंबोजने पहिल्याच सामन्यात यजमान संघाला धावा लुटून दिल्याने भारताच्या हातून सामना निसटला.