Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट

IND vs WI 3rd ODI First Innings Live: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजला ३५२ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 07:03 PM
IND vs WI 3rd ODI First Innings

IND vs WI 3rd ODI First Innings

Follow Us
Follow Us:
  • गिल-कोहली स्वस्तात बाद
  • रोहित-राहुलचा पलटवार
  • भारताने ठोकल्या ३५१ धावा
India vs West Indies 3rd ODI Live: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना सध्या सुरु आहे. न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेस्ट इंडिजला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्माने शानदार खेळी करत ९२ धावा केल्या. तर, विकेटकीपर केएल राहुलने खणखणीत शतक ठोकत १२९ धावांची नाबाद खेळी केली. या दोघांच्या वादळी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ५० षटकांत ७ विकेट्स गमावून ३५१ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजसमोर ३५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King

भारताने उभा केला भक्कम स्कोअर

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सने भारतीय संघाला सुरुवातीलाच धक्के दिले. कर्णधार शुभमन गिल फक्त १ धावंवर पव्हेलियनमध्ये परतला. यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली देखील शून्यावर तंबूत परतला. जेडन सील्सने दोन्ही फलंदाजांना बाद केले. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने सूत्रे हाती घेतली आणि ९२ धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान रोहितने १० चौकार आणि ३ षटकार मारले. यासह, ‘हिटमॅन’ रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. रोहित बाद झाल्यानंतर, ऋतुराज गायकवाडने देखील शानदार फलंदाजी करत ५७ धावा ठोकल्या. त्याने अर्धशतक झळकावून डाव पुढे नेला.

के एल राहुलचे खणखणीत शतक

मधल्या षटकांमध्ये विकेट पडण्याचे सत्र सुरुच होते, पण विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलने एक बाजू खंबीरपणे सांभाळली. राहुलने आपला उत्कृष्ट फॉर्म दाखवत ८७ चेंडूंमध्ये नाबाद १२९ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि षटकार ठोकत शानदार शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने भक्कम स्कोअर उभा केला.  अखेरीस, अंशुल कंबोजने १७ धावा आणि नमन धीरने ३० धावांचे योगदान देत संघाला ३५० धावांच्या पुढे नेले. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सने तीन, तर कीमो पॉलने दोन आणि गुडाकेश मोतीने एक विकेट घेतला.

1️⃣0️⃣,0️⃣0️⃣0️⃣ of the most 𝗞𝗟𝗮𝘀𝘀𝘆 𝗿𝘂𝗻𝘀🫡#TeamIndia vice-captain KL Rahul reaches a magnificent milestone in international cricket 👏👉 Updates ▶️ https://t.co/PhSJSbvW7C#INDvWI | @mflone_ | @klrahul pic.twitter.com/YfGWdgCXBj — BCCI (@BCCI) October 3, 2026

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अंशुल कंबोज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार.

वेस्ट इंडिज : जॉन कॅम्पबेल, ज्युएल अँड्र्यू, शाई होप, अमीर जांगू, शेरफेन रदरफोर्ड, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, विटाले लावेस

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD

Web Title: Ind vs wi 3rd odi live rohit sharma kl rahul 351 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • IND vs WI 3rd T20
  • IND vs WI ODI Series
  • KL Rahul Captain
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd ODI Live: हिटमॅनचा ‘विराट’ पराक्रम! Rohit Sharma ने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त
1

IND vs WI 3rd ODI Live: हिटमॅनचा ‘विराट’ पराक्रम! Rohit Sharma ने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी
2

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी

IND vs WI 3rd ODI: चंदीगडच्या मैदानात धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? खेळपट्टी कोणाला देणार साथ; पाहा Pitch Report
3

IND vs WI 3rd ODI: चंदीगडच्या मैदानात धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? खेळपट्टी कोणाला देणार साथ; पाहा Pitch Report

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report
4

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.