Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

IND vs WI 5th t20 Cancelled Series drawn by 2-2: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्या. यामुळे टीम इंडियाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 01:50 PM
IND vs WI 5th t20 Cancelled Series drawn

IND vs WI 5th t20 Cancelled Series drawn

Follow Us
Follow Us:
  • बंगळुरूत पावसाची बॅटिंग
  • निर्णायक सामना रद्द
  • T20 मालिका 2-2 ने संपली
IND vs WI 5th t20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी२० सामना अखेर पावसामुळे रद्द झाला. हा सामना बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. परंतु, सामना सुरु होण्याआधी पावसाची बॅटिंग सुरु झाली. जवळपास अडीच तासांच्या विलंबानंतर सामना पुन्हा सुरू झाला. पंचांनी हवामानाचा अंदाज घेत सामना प्रत्येक संघासाठी नऊ षटकांचा केला. वेस्ट इंडिजने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताल फलंदाजीचे आमंत्रण दिले. परंतु, भारतीय डावातील केवळ ७.४ षटकेच खेळून झाली होती, तेव्हा पुन्हा एकदा पावसाने खोळंबा घातला. अखेर सामना रद्द करण्यात आला. यासह, हाय-व्होल्टेज पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. (IND vs WI 5th t20 Cancelled Series drawn by 2-2)

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

दोन्ही संघाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. मालिकेत दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. मालिकेचा निकाल बंगळूरु येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी२० सामन्यावर अवलंबून होता, परंतु पावसामुळे तो सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्याने भारतीय फलंदाजांचे कौतुक केले, परंतु गोलंदाजांवर तो नाराज होता.

मालिका संपल्यानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?

पाचवा टी-२० सामना रद्द झाल्यानंतर झालेल्या मुलाखतीत श्रेयस अय्यरने भारताच्या गोलंदाजीवर निराशा व्यक्त केली. त्याने भारतीय फलंदाजांचे कौतुक केले आणि विरोधी संघाचा कर्णधार शाई होपचेही कौतुक केले. तो म्हणाला की, ‘जर आम्ही दुसऱ्या आणि चौथ्या टी-२० सामन्यात चांगली गोलंदाजी केली असती, तर निकाल पूर्णपणे वेगळा लागला असता. संपूर्ण मालिकेत फलंदाजी उत्कृष्ट झाली आहे. आम्हाला फक्त लय साधता आली नाही आणि तिथेच आम्ही थोडे कमी पडलो.’

भारत -वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा निकाल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने १७२ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने १४.४ षटकांत हे लक्ष्य पूर्ण केले आणि ८ विकेट्सने विजय नोंदवला. रांची येथे खेळला गेलेल्या दुसरा टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, शाई होपच्या वेगवान शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने हा दुसरा सामना ६ विकेट्सने जिंकला.

इंदौर येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामन्यात धावांचा पाउस पडला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २२४ धावांचे लक्ष्य ठेवले. वेस्ट इंडिज २० षटकांत केवळ २०९ धावाच करू शकला आणि भारताने १४ धावांनी विजय मिळवला.चौथ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने शानदार पुनरागमन केले. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ २२३ धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे वेस्ट इंडिजला २४ धावांनी विजय मिळाला. पाचवा टी२० सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, परिणामी सामना २-२ असा बरोबरीत सुटला.

Hong Kong Sixes 2026: क्रुणाल पांड्या बनला टीम इंडियाचा कॅप्टन; भुवनेश्वरच्या जागी ‘या’ खेळाडूची एन्ट्री

Web Title: Ind vs wi 5th t20 match abandoned due to rain series drawn 2 2 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shai Hope
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?
1

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान
2

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…
3

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी
4

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.