Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

ICC Fined India and west Indies For Slow Over Rate: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना न्यू चंदीगड येथे खेळला गेला. वेस्ट इंडिजने एक दणदणीत विजय मिळवला. आता, दोन्हीही संघाना आयसीसीने दंड ठोठावला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 04:19 PM
ICC Fined India and west Indies

ICC Fined India and west Indies

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजला ICCचा धक्का
  • ‘या’ नियमाच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
  • स्लो ओव्हर रेट पडला महागात
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका २-१ ने जिंकली. परंतु, भारताने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकले, तर वेस्ट इंडिजने तिसरा सामना जिंकला. एकदिवसीय मालिका संपली असली तरी, दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने भारत आणि वेस्ट इंडिजवर मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटमुळे कठोर शिक्षा झाली आहे.

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

भारत आणि वेस्ट इंडिजवर आयसीसीची कारवाई

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना ३ ऑक्टोबर रोजी न्यू चंदीगड येथे खेळला गेला. भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा चार षटके कमी टाकली. यामुळे, आयसीसीने संघाच्या सामना शुल्कातून २० टक्के कपात केली. निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकल्याबद्दल वेस्ट इंडिज संघालाही दंड ठोठावण्यात आला. संघाला एकूण रकमेच्या १० टक्के दंड आकारण्यात आला. आयसीसीचे पंच प्रकाश भट्ट यांनी दोन्ही संघांना हे दंड ठोठावला आहे. या प्रकरणात कोणतीही सुनावणी झाली नाही, कारण दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपली चूक मान्य केली होती. शुभमन गिल आणि शाई होप यांच्याविरुद्ध मैदानातील पंच जयरामन मदनगोलुप आणि सॅम नोगज्स्की यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. तिसरे पंच शरफुदुल्ला इब्ने शाहिद आणि चौथे पंच वीरेंद्र शर्मा यांनीही तक्रारी दाखल केल्या होत्या.

भारताने तिसरा एकदिवसीय सामना गमावला

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ७ विकेट्स गमावून ३५१ धावा केल्या. भारतासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी केली. राहुलने एक खणखणीत शतक झळकावले. तिसरा सामना जिंकून टीम इंडिया क्लीन स्वीप करेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. वेस्ट इंडिजने अवघ्या ४८.२ षटकांत सामना जिंकला. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने १६२ धावांची नाबाद खेळी केली.

टी२० मालिकेचा थरार रंगणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ६ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनौ येथे खेळला जाईल. दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. नुकतेच, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

Web Title: Ind vs wi icc fined india west indies slow over rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • ICC
  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series

संबंधित बातम्या

IND vs WI T20: वनडे मालिकेनंतर टी20चा धुमाकूळ! पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

IND vs WI T20: वनडे मालिकेनंतर टी20चा धुमाकूळ! पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक
2

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक

IND vs WI 3rd ODI: Hope ने वेस्ट इंडिजला दिला ‘आशेचा किरण’, सिरीज भारताच्या खिशात, राहुलची खेळी व्यर्थ
3

IND vs WI 3rd ODI: Hope ने वेस्ट इंडिजला दिला ‘आशेचा किरण’, सिरीज भारताच्या खिशात, राहुलची खेळी व्यर्थ

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण
4

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.