Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hong Kong Sixes : बीसीसीआयचा मोठा निर्णय! हाँगकाँग सिक्सेसमधून मिळालेली रक्कम दिव्यांग क्रिकेटसाठी दान

Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेतून मिळणारी रक्कम बीसीसीआय तीन दिव्यांग क्रिकेट संस्थांना दान करणार आहे. व्हीलचेअर, दृष्टिहीन आणि मूकबधिर क्रिकेटपटूंना याचा लाभ मिळणार असून जय शाह आणि बीसीसीआयचे हाँगकाँग क्रिकेटने आभार मानले आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 19, 2026 | 04:27 PM
Hong Kong Sixes : बीसीसीआयचा मोठा निर्णय! हाँगकाँग सिक्सेसमधून मिळालेली रक्कम दिव्यांग क्रिकेटसाठी दान

Hong Kong Sixes : बीसीसीआयचा मोठा निर्णय! हाँगकाँग सिक्सेसमधून मिळालेली रक्कम दिव्यांग क्रिकेटसाठी दान

Follow Us
Follow Us:
  • BCCI कडून सामाजिक बांधिलकीेचे दर्शन
  • दिव्यांग क्रिकेटला मिळणार आर्थिक पाठबळ
  • 1992 पासून हाँगकाँग सिक्सेसची परंपरा
 

Hong Kong Sixes : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. 2026 मध्ये झालेल्या हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेतून बीसीसीआयला मिळणारी रक्कम दिव्यांग क्रिकेटच्या विकासासाठी काम करणाऱ्या तीन संस्थांना दान करण्यात येणार आहे. व्हीलचेअर क्रिकेट इंडिया असोसिएशन, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया आणि इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन या संस्थांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर क्रिकेट हाँगकाँग, चायना (CHKC) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआयचे विशेष आभार मानले आहेत. सहयोगी सदस्य देशांमधील क्रिकेटच्या विकासासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी दिलेल्या पाठिंब्याचे त्यांनी कौतुक केले.

2026 मधील हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत आठ पूर्ण सदस्य देश आणि चार सहयोगी सदस्य देश अशा एकूण 12 आंतरराष्ट्रीय संघांनी सहभाग घेतला होता. वेगवान आणि रोमांचक क्रिकेटसह नवोदित क्रिकेट राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली.

दिव्यांग क्रिकेटला मिळणार आर्थिक पाठबळ

बीसीसीआयने स्पर्धेतून मिळणारे आपले शुल्क तीन संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीलचेअरवर क्रिकेट खेळणारे खेळाडू, दृष्टिहीन क्रिकेटपटू आणि मूकबधिर क्रिकेटपटू यांच्या विकासासाठी या मदतीचा उपयोग होणार आहे. क्रिकेट सर्वांसाठी खुले असावे आणि खेळाच्या माध्यमातून सामाजिक समावेशाला प्रोत्साहन मिळावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, जगातील सर्वात मोठे क्रिकेट मंडळ म्हणून बीसीसीआयची जबाबदारी केवळ भारतापुरती मर्यादित नाही. सहयोगी देशांमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्यासोबतच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पाठिंबा देणे हे मंडळाचे कर्तव्य आहे. क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या विकासाला हातभार लावणे हे बीसीसीआयचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल

क्रिकेट हाँगकाँग, चायनाच्या संचालक मंडळाचे सदस्य अनुराग भटनागर यांनीही जय शाह आणि बीसीसीआयचे आभार मानले. सहयोगी सदस्य देशांमधील क्रिकेटच्या विकासासाठी तसेच दिव्यांग क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

1992 पासून हाँगकाँग सिक्सेसची परंपरा

हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेची सुरुवात 1992 मध्ये झाली. आयसीसीच्या मान्यतेने आणि हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्र सरकारच्या पाठिंब्याने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. 2026 च्या स्पर्धेत 12 पुरुष राष्ट्रीय संघांसह महिलांचा विशेष प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. वेगवान क्रिकेट, सामाजिक समावेश आणि आशियातील क्रिकेटचा विकास या उद्दिष्टांना या स्पर्धेने चालना दिली.

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीसीसीआयने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेतील रक्कम कोणासाठी दान केली आहे?

    Ans: बीसीसीआयने स्पर्धेतून मिळणारी रक्कम दिव्यांग क्रिकेटच्या विकासासाठी काम करणाऱ्या तीन संस्थांना दान करण्याची घोषणा केली आहे.

  • Que: बीसीसीआयच्या देणगीतून कोणत्या संस्थांना मदत मिळणार आहे?

    Ans: व्हीलचेअर क्रिकेट इंडिया असोसिएशन, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया आणि इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन या संस्थांना मदत मिळणार आहे.

  • Que: हाँगकाँग सिक्सेस २०२६ मध्ये किती संघ सहभागी झाले होते?

    Ans: या स्पर्धेत आठ पूर्ण सदस्य आणि चार सहयोगी सदस्य देशांचे असे एकूण 12 आंतरराष्ट्रीय संघ सहभागी झाले होते.

Web Title: Bcci donates hong kong sixes fees to disability cricket charities rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • BCCI India
  • Hong Kong Cricket Sixes
  • ICC

संबंधित बातम्या

Team India ला मोठा दणका; न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या सामन्यात झाली ‘ही’ चूक; आयसीसीने केली कारवाई
1

Team India ला मोठा दणका; न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या सामन्यात झाली ‘ही’ चूक; आयसीसीने केली कारवाई

Gurnoor Brar ला अति आक्रमकपणाचे सेलिब्रेशन नडले; ICC केली ‘ही’ मोठी कारवाई
2

Gurnoor Brar ला अति आक्रमकपणाचे सेलिब्रेशन नडले; ICC केली ‘ही’ मोठी कारवाई

Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड
3

Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड

WPL 2027 मध्ये मोठा बदल! ब्रेबोर्नऐवजी वानखेडेवर रंगणार मुंबईतील सर्व सामने
4

WPL 2027 मध्ये मोठा बदल! ब्रेबोर्नऐवजी वानखेडेवर रंगणार मुंबईतील सर्व सामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.