फोटो सौजन्य - बीसीसीआय
India vs West Indies first innings : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती. इंग्लडविरुद्ध दमदार कसोटी मालिकेनंतर आता भारत वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळत आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे. 44.1 ओवरमध्ये भारताच्या संघाने वेस्टइंडीज च्या सर्व फलंदाजांना बाद करून दुसऱ्याच सेशनमध्ये पहिला डावाचा वेस्टइंडीजचा खेळ संपवला आहे.
या सामन्यांमध्ये विशेष कौतुक हे भारतीय गोलंदाजाचे असेल भारतीय गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर मोहम्मद सिराज याने संघासाठी चार विकेट्स घेतले तर जसप्रीत बुमराहने संघाला तीन विकेट्स मिळवून दिले. बऱ्याच महिन्यानंतर संघामध्येच स्थान मिळवणारा कुलदीप यादवने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले तर वॉशिंग्टन सुंदरच्या हाती देखील एक विकेट लागली. मोहम्मद सिराज याने टेगेनरीने चंद्रपाल, ॲलेक अथनझे, ब्रँडोन किंग आणि वेस्टइंडीज चा कर्णधार रोस्टन चेस यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
Innings Break and that’s Tea on Day 1 of the 1st Test. Kuldeep Yadav picks up the final wicket as West Indies is all out for 162 runs. Scorecard – https://t.co/Dhl7RtjvWY #INDvWI #1stTEST #TeamIndia @IDFCfirstbank pic.twitter.com/n8WmaUC1OJ — BCCI (@BCCI) October 2, 2025
नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीमुळे टीम इंडियाला शानदार सुरुवात मिळाली. डावाच्या चौथ्या षटकात सिराजने कॅरेबियन संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर, १० व्या षटकात सिराजने ब्रँडन किंगला क्लीन बोल्ड केले. वेस्ट इंडीजच्या संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. एकही फलंदाजाने 35 चा आकडा पार केला नाही. त्यामुळे वेस्टइंडीजचा संघ मोठी धावसंख्या भारतासमोर उभा करण्यात अपयशी ठरला.
पहिल्या तासातच संघाने ४२ धावांत चार विकेट गमावल्या. सिराजने तेजनारायण चंद्रपॉल (०), ब्रँडन किंग (१२) आणि अॅलिक अथानाझे (१३) यांना बाद केले, तर बुमराहने जॉन कॅम्पबेल (८) यांना बाद केले. त्यानंतर कर्णधार रोस्टन चेस आणि शाई होप यांनी पाचव्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. होपला कुलदीप यादवने बाद केले आणि त्याच्या विकेटसह पंचांनी लंच बोलावण्याचा निर्णय घेतला. होपने २६ धावा केल्या. दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजने कर्णधार रोस्टन चेसला सिराजने २४ धावांवर बाद केले.
Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत
त्यानंतर सुंदरने खारी पियरे (११) ला पायचीत केले. त्यानंतर बुमराहने जस्टिन ग्रीव्हज (३२) आणि जोहान लायन (१) यांना दोन घातक यॉर्कर मारून क्लीन बोल्ड केले. कुलदीपने वॉरिकन (८) ला यष्टीरक्षक ज्युरेलकडून झेलबाद करून वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर संपवला. दुसऱ्या डावाच्या मध्यात वेस्टइंडीजचा संघ सर्वबाद झाल्यानंतर आता भारताचा संघ फलंदाजी करेल.