फोटो सौजन्य - सोशल मिडिया/यूट्युब
आशिया कप फायनल मध्ये भारताच्या संघाला ट्रॉफी न दिल्यामुळे मोठा वाद पाहायला मिळाला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्की हे भारतीय संघाला ट्रॉफी देणार होते पण पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भारत पाकिस्तान वादामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफी न देता ती तशीच घेऊन गेले. त्यानंतर सोशल मीडियावर हा वाद आणखीनच पेटला होता एवढेच नव्हे तर यासंदर्भात क्रिकेट असोसिएशनची बैठक देखील पार पडली.
अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून भारताने आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले. या विजयानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने ट्रॉफी समारंभ वादात सापडला. त्यानंतर मोहसिन नक्वी ट्रॉफी आणि पदक त्याच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याच्या या कृतीनंतर, बीसीसीआयने ट्रॉफी परत न केल्यास आयसीसीला तक्रार करण्याची धमकी दिली.
तथापि, मोहसिनने बीसीसीआयला ट्रॉफी दिली नाही. लाहोरला जाण्यापूर्वी त्यांनी ती यूएई बोर्डाला सुपूर्द केली. आशिया कप 2025 चार ट्रॉफीच्या वादावर आता दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने मोहसिनकडून ट्रॉफी न स्वीकारण्याच्या भारताच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण आणि क्रिकेट एकमेकांपासून दूर ठेवले पाहिजे असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.
खरं तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब शोमध्ये असेही म्हटले आहे की अशा घटना खेळाडूंना अस्वस्थ करतात आणि खेळाच्या खऱ्या भावनेपासून विचलित करतात. त्याने भारतीय संघाच्या कामगिरीचे उघडपणे कौतुक केले आणि म्हटले की संघाने मोठ्या प्रसंगी स्वतःला सिद्ध केले आहे.
२०२५ च्या आशिया कपमधील भारताच्या विजयाभोवतीच्या वादाचा संदर्भ देताना, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स म्हणाला की राजकारण आणि खेळ यांच्यात एक स्पष्ट रेषा काढली पाहिजे. “टीम इंडिया ट्रॉफी कोण देत होते यावर खूश नव्हती. पण मला वाटत नाही की खेळात राजकारण येऊ द्यावे. खेळ हा खेळच राहिला पाहिजे – हे पाहून वाईट वाटले.”
Historic win for Nepal, a 9th Asia Cup title for India, England announce their Ashes squad, and a whole lot more in this week’s #360Show. The next episode drops at 3pm SAST / 6.30pm IST. So stay tuned: https://t.co/vRAfKl5jDd pic.twitter.com/NeWLzsXxwp — AB de Villiers (@ABdeVilliers17) October 1, 2025
त्यांनी पुढे सांगितले की, भारत खूप मजबूत दिसत आहे. टी-२० विश्वचषक जवळ येत आहे आणि असे दिसते की टीम इंडिया कठीण परिस्थितीतही चांगले खेळत आहे. त्यांच्याकडे प्रतिभेची कमतरता नाही.