Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका

IND Vs ZIM : रायपूर येथे पार पडलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने झिम्बॉब्वेचा पराभव केला. अशाप्रकारे भारताने २-० अशी मालिकेत आघाडी मिळवली असून मालिकाही आपल्या नावे केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 18, 2026 | 09:27 PM
IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका

IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका

Follow Us
Follow Us:
  • शेफाली-स्मृतीकडून चौकार, षटकारांचा पाऊस
  • 9 व्या ओव्हर्समध्येच विजयाला गवसणी
  • चिपो व जोसेफिनने झिम्बॉब्वेचा डाव सावरला
 

IND Vs ZIM : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशन स्टेडियम येथे पार पडलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवत सामन्यासह मालिका आपल्या खिशात घातली.  झिम्बॉब्वेने प्रथम फलंदाजी करत 8 बाद 103 धावांचे तुल्यबळ आव्हान भारतासमोर दिले होते.
या धावांचा पाठलाग करताना मागील सामन्यात सपशेल फेल ठरलेल्या पहिल्या फळीने यंदा मात्र त्याचा वचपा काढला व 11 ओव्हर्स शिल्लक राखत दुसरा सामना तर जिंकलाच, तसेच मालिकाही आपल्या नावे केली. या सामन्यात सलामीला आलेल्या शेफाली वर्मा व कर्णधार स्मृती मंधानाने चौकार व षटकारांचा अक्षरशः पाऊसच पाडला.

भारताची आक्रमक सुरुवात

झिम्बॉब्वेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्मा व कर्णधार स्मृती मंधानाने चौकार व षटकार ठोकण्यास सुरुवात केली. चौथ्या ओव्हर्सपर्यंत शेफालीने दोन वेळा चेंडू सीमारेषेच्या पारही पोहचवला होता. या दोघींचा आक्रमकपणा पाहता, झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांसह क्षेत्ररक्षक दबावात आले.
दरम्यान, पाचव्याच ओव्हर्समध्ये भारताने धावांचे अर्धशतक गाठले होते. शेफालीने 6 चौकार व 4 षटकारांसह 55 धावा केल्या, तर स्मृतीने 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 47 धावांनी तिला चांगली साथ दिली.
भारताने अशाप्रकारे 67 बॉल शिल्लक राखत हा सामना जिंकला. आता मालिकेतील पुढील सामना मंगळवार 20 ऑक्टोबरला याच रायपूरच्या स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडियाचा फिनिशर रणजीतही चमकला! आधी बिहार, आता गोव्याविरुद्ध Rinku Singh ने ठोकलं खणखणीत शतक

चिपो व जोसेफिनने डाव सावरला

झिम्बॉब्वेने पहिल्या सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकून त्यांनी तशीच काहीशी कामगिरी करण्याच्या हेतूने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण मागील सामन्यात 42 धावांची कामगिरी करणारी केलीस एनधलोवू या सामन्यात भोपळाही फोडू शकली नाही. नंदनी शर्माने त्रिफळाचीत करत चौथ्याच षटकात झिम्बॉब्वेला जबर धक्का दिला.

त्याच्या दोन ओव्हर्सनंतर दीप्ति शर्माने बिलव्हड बिझा (7) हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद करत तिलाही पॉव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच पहिल्या सामन्यात 43 धावा करणारी शेरन मेयर्स या सामन्यात फक्त 9 धावांचे योगदान देऊ शकली. क्रांती गौडची ती शिकार ठरली. मधल्या काळात चिपो मुग्री टिरीपानो व कर्णधार जोसेफिन कोमो (नाबाद 27) यांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.

या भागीदारीमुळेच झिम्बॉब्वे शंभर धावापर्यंत मजल मारू शकली. दरम्यान, निकी प्रसादने यष्टीमागे रिचा घोषकरवी चिपोला बाद केले. चिपोने 5 चौकारासह 34 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या न्यासा ग्वान्झुरूला निकीने त्रिफळाचीत करत तिला आपले खातेही खोलू दिले नाही. भारताकडून निकीने 2 ओव्हर्समध्ये 7 धावा देत 2 गडी बाद केले.

IND vs NZ: वेस्ट इंडिज सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार; T20, वनडे अन् कसोटीचा थरार रंगणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Web Title: Ind vs zim india women beat zimbabwe win t20 series rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • Harmanpreet Kaur
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND Vs ZIM : भारताचं दमदार कमबॅक, मालिका जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान
1

IND Vs ZIM : भारताचं दमदार कमबॅक, मालिका जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात
2

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला
3

IND Vs ZIM : Overconfident भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात विजय; पण झिम्बॉब्वेने आरसा दाखवला

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज
4

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.