
women's asia cup 2026
भारतीय संघ आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये दाखल
आज बांग्लादेश अन् यूएई भिडणार
आशिया कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये तीन संघ निश्चित
Women’s Asia Cup 2026: महिला आशिया चषक २०२६ मधील साखळी सामने आता अंतिम टप्प्यात आले असून स्पर्धेतील थरार कमालीचा वाढला आहे. आतापर्यंत तीन संघांनी चमकदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, सेमीफायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता असणार, हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ आधीच सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताची गाठ नेमकी कोणाशी पडणार? हे अजून स्पष्ट झालेले नाही. आज होणारा महत्त्वाचा सामना या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे. स्पर्धेत तीन संघ आधीच सुरक्षित स्थितीत पोहोचले असले तरी चौथ्या स्थानासाठी उर्वरित संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे.
ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप
भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत वर्चस्व राखले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने सलग तीन सामने जिंकले आहेत. आहे. हरमनप्रीत कौरच्या रणनीतीमुळे संघ मजबूत स्थितीत आहे. तरीही उपांत्य सामन्यातील आव्हान सोपे नसेल. आजच्या सामन्याचा निकाल लागताच भारतीय महिला क्रिकेट संघ २८ जुलै रोजी किंवा आगामी सेमीफायनलच्या दिवशी नक्की कोणत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैदानात उतरेल, हे स्पष्ट होणार आहे.
बी ग्रुपमध्ये सेमीफायनलमध्ये चौथ्या स्थानावर कोण जाणार हे आज ठरणार आहे. आज बांग्लादेश आणि यूएई यांच्यात साखळी सामना होणार आहे. यांच्यात विजयी होणारा एक संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहे. भारतीय संघाने ए ग्रुपमध्ये स्थान मिळवल्यामुळे, नियमानुसार सेमीफायनलमध्ये भारताची ग्रुप बी गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होणार आहे.
IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई
फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला आशिया कप २०२६ स्पर्धेतील सामना ५ सप्टेंबर रोजी खेळला गेला. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला आणि एकतर्फी विजय नोंदवला. या सामन्यात पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सनाने भारताच्या शफाली वर्माला बाद केल्यानंतर तिला सेंड ऑफ चा इशारा केला.त्यानंतर आयसीसीने तिच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.