फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा दहावा सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या संघाचा हा पहिला पराभव होता. टीम इंडियाने पहिल्या दोन सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याचा पराभव झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती पण फलंदाजी फारच निराशाजनक राहिली. भारतीय संघाचा पुढील सामना हा आणखीनच कठीण आणि आव्हानात्मक असणार आहे.
भारतीय महिला संघाचा पुढील सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 12 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विश्वचषकाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर संघाने आतापर्यत एकही सामना गमावलेला नाही पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला पराभूत केले होते तर पुढील सामना म्हणजेच श्रीलंकेविरुद्ध सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये बेथ मुनीच्या जोरावर त्यांनी सामना जिंकला होता.
धोनीचा 7 नंबर शुभमन गिलसाठी ठरला लकी! वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात खराब नशीबाने सोडली साथ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा विश्वचषकाचा सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार महिला विश्वचषकाचा सामना हा 12 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना विशाखापट्टणम ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला कमबॅक करण्याची संधी आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर क्रिकेट चाहते पाहू शकतात. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहाॅटस्टारवर पाहता येणार आहे. भारताच्या संघामधून फक्त ऋचा घोष आणि स्नेह राणा यांनी चांगली कामगिरी केली त्याचबरोबर प्रतिका रावलने देखील चांगली खेळी खेळली पण या खेळाडूंना इतर खेळाडूंची साथ लाभली नाही.
एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्धचा हा सलग तिसरा विजय आहे. गेल्या दोन एकदिवसीय विश्वचषकांमध्येही दक्षिण आफ्रिकेने भारताला हरवले होते. या विश्वचषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेपूर्वी भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेला हरवले होते. त्यानंतर, त्यांना विजयाची हॅटट्रिक गाठण्याची संधी होती, परंतु ते तसे करण्यात अपयशी ठरले आणि दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.