
IND w vs AUS W, T-20 Series: Australia beat India by 19 runs; series tied 1-1
Australia beat India by 19 runs : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामाना भारताने आपल्या नावावर केला आहे. तर १९ फेब्रुवारी कॅनबेरा येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुसऱ्या ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा १९ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जॉर्जिया वोल (८८) आणि बेथ मुनी (४६) यांच्या १२८ धावांच्या विक्रमी सलामी भागीदारीमुळे, ऑस्ट्रेलियन महिला संघाने १६३ धावा उभ्या केल्या. तर प्रतिउत्तरात भारतीय संघ १४४ धावा करू शकला.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास
वोल आणि मुनीची सलामी भागीदारी ही ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या होती, ज्यामुळे यजमान संघाला पाच बाद १६३ धावांपर्यंत पोहोचता आले. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने दमदार सुरुवात केली परंतु २० षटकांत नऊ बाद १४४ धावाच करू शकला, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरने ३६, स्मृती मानधना ३१ आणि शफाली वर्मा यांनी २९ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनरने २२ धावांत तीन बळी घेतले, तर किम गार्थ, अॅनाबेल सदरलँड आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार सोफी मोलिनेक्सने प्रत्येकी दोन बळी घेतले. शनिवारी अॅडलेड ओव्हल येथे मालिका निर्णायक सामना खेळवला जाईल. नवव्या षटकात भारताने एक बाद ६५ धावा केल्या होत्या, परंतु पाहुण्या संघाने अखेर सात धावांत सहा विकेट गमावल्या. शफाली (२३ चेंडूत पाच चौकार) च्या झटपट सुरुवातीनंतर, मानधनानेही मुक्तपणे खेळ केला. दोन्ही भारतीय सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये ५४ धावा केल्या. पण मोलिनूने शफालीला पायचीत करून भागीदारी संपवली आणि गार्डनरने जेमिमा रॉड्रिग्ज (०४) चा महत्त्वाचा बळी घेतला. सलग दोन विकेट पडल्यानंतर भारताचा धावगती मंदावली.
Australia win the 2nd T20I by 19 runs.#TeamIndia will aim to bounce back in the series decider on Saturday. Scorecard ▶️ https://t.co/8prXc1p5fJ#AUSvIND pic.twitter.com/2dSdGdcQbB — BCCI Women (@BCCIWomen) February 19, 2026
भारतीय प्लेइंग 11 : स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर(कर्णधार) , ऋचा घोष, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, क्रांती गौड, श्रीचरणी, रेणुका सिंग ठाकूर
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबे लीचफील्ड, एलिसे पेरी, एशले गार्डनर, जॉर्जिया वेयरहैम, एनाबेल सदरलैंड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गार्थ, डार्सी ब्राउन