Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार

Harmanpreet Kaur 200 T20 match Against Sa in Women t 20 world cup 2026: भारतीय महिला संघ रविवारी मँचेस्टरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘अ’ गटातील महत्त्वाचा सामना खेळणार असून, सलग तिसऱ्या विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल. या सामन्यात उतरल्यास कर्णधार हरमनप्रीत कौर २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरू

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 21, 2026 | 03:07 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने
  • हरमनप्रीत कौर रचणार नवा इतिहास
  • खेळणार 200 वा टी20 सामना
महिला टी- २० विश्वचषक २०२६ (ICC Womens t20 Wolrd Cup 2026) स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या सामन्यात भारतीय संघ रविवारी ( दि. २१) दक्षिण आफ्रिकेशी संघाशी भिडणार आहे. हा सामना मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. सलग दोन विजयांसह भारतीय संघ ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर असून, विजयांची हॅटट्रिक साधण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेनेही आपला शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली. त्यामुळे आजच्या सामन्याच चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात इतिहास रचणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरल्यावर, ती २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरेल. हरमनप्रीतच्या या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात इंग्लंडमध्ये झालेल्या २००९ च्या महिला टी-२० विश्वचषकाने झाली.

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

भारताची विजयी मालिका, दक्षिण अफ्रिकाही फॉर्ममध्ये

भारताने पाकिस्तावर ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर नेदरलँड्सचा ९५ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २०९ धावा केल्या आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला ११४ धावांवर सर्वबाद केले. सलामीवीर स्मृती मंधानाने ४७ चेंडूंमध्ये ७४ धावांची शानदार खेळी केली.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. पाकिस्तानविरुद्ध संघाने १६.५ षटकांत १२७ धावांचे लक्ष्य गाठले आणि २ विकेट्सने विजय मिळवला. अष्टपैलू खेळाडू अँरी डर्कसनने ३५ चेंडूंमध्ये ५२ धावा करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

हरमनप्रीत कौरच्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम

या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. जर ती दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरली, तर हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० वा टी२० सामना असेल. यासह, हरमनप्रीत पुरुष आणि महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात २०० सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू बनेल. आतापर्यंत कोणत्याही पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूने हा पराक्रम केलेला नाही. पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक १६३ सामने खेळले आहेत, तर महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू म्हणून हरमनप्रीत आधीच ओळखली जाते.

महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने

  • हरमनप्रीत कौर – १९९*
  • सुझी बेट्स – १८४
  • डॅनी वायट – १८२
  • एलिस पेरी – १७७
  • स्मृती मंधाना – १६८
हरमनप्रीत कौरने १९९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, १७८ डावांमध्ये ३०.०९ च्या सरासरीने ४,१२३ धावा केल्या आहेत. तिच्या नावावर एक शतक आणि १७ अर्धशतके असून, तिची सर्वोत्तम धावसंख्या १०३ आहे. महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिचा तिसरा क्रमांक लागतो.

खेळपट्टी कशी असेल?

मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. परंतु, वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९० ते २०० धावांच्या दरम्यान असते, त्यामुळे एक मोठा धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे.

दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग ११

भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीकीपर), यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा.

दक्षिण आफ्रिका: एल. वोल्वार्ड (कर्णधार), सुने लुस, ॲन्री डेर्कसेन, मारिझान कॅप, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, कायला रेनेके, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Web Title: Ind w vs sa w t20 world cup 2026 harmanpreet kaur 200 matches history india vs south africa preview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • Ind Vs Sa
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?
1

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.