
निशांत सिंधुने पटकावल्या ४ विकेट्स
भारत अ चा अफगणिस्तानवर १०१ रन्सने विजय
ट्राय सिरिजमधले भारताचे आव्हान कायम
India A Vs Afghanistan A Live Updates: श्रीलंकेत सध्या ट्राय सिरिज सुरू आहे. आज भारत अ विरुद्ध अफगणिस्तान अ या दोन संघांमध्ये महत्वाचा सामना पार पडला. ट्राय सिरिजमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीय संघाला विजय आवश्यक होता. भारताने अफगणिस्तानला ३५० रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर अफगणिस्तानचा (Cricket) संघ २१८ रन्सवर ऑल आउट झाला. भारत अ संघाचा १०१ रन्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सिरिजमध्ये भारताची आशा अद्याप टिकून राहिला आहे.
अफगणिस्तानची फलंदाजी
भारताने प्रथम फलंदाजी करून अफगणिस्तानला ३५० रन्सचे टार्गेट दिले होते. ३५० रन्सचा पाठलाग करण्यासाठी अफगणिस्तानच्या संघाकडून कर्णधार इम्रान मीर आणि हसन ईसाखिल यांनी सुरुवात केली. इम्रान मीर ३२ रन्सची खेळी करून आउट झाला. तर हसन ईसाखिल १४ रन्स करून आउट झाला. खालिद तानीवल केवळ १३ रन्सची खेळी करून आउट झाला.
INTO THE FINALS 👏 India A clinch a magnificent 1️⃣0️⃣1️⃣-run win over Afghanistan A to book their spot in the finals of the #TriNationSeries 💙 Scorecard ▶️ https://t.co/Kg9IWt7M5b#INDAvAFGA pic.twitter.com/kZ6YL4ngod — BCCI (@BCCI) June 17, 2026
फैसल शिनजोडने आणि बाहिर शाह यांनी अफगणिस्तानचा डाव सांभाळला. फैसल शिनजोडने ४६ रन्सची आक्रमक खेळी केली. तर बाहिर शाहने शानदार अर्धशतकी खेळी केली. तो ५७ रन्स करून आउट झाला. मोहम्मद इशाक 16 रन्सची खेळी केली. बाकी तळातले फलंदाज स्वस्तात परतले. त्यामुळे संघाला २१८ रन्सपर्यन्त मजल मारता आली.
भारताची गोलंदाजी
भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली. यश ठाकूरने २ विकेट्स घेतल्या. अंशूल कंबोजने १ विकेट पटकावली. निशांत सिंधुने एकूण ४ विकेट्स घेतल्या. विप्रज निगमने १ विकेट घेतली. सुयश शेडगे आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी १ विकेट घेतली.
India A संघात ‘या’ अफलातून खेळाडूची एन्ट्री; बीसीसीआयने केली मोठी घोषणा, कारण काय?
भारताची फलंदाजी
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करून ३४९ रन्स केल्या. प्रियांश आर्य आणि वैभव सूर्यवंशीने शानदार सुरुवात केली. प्रियांश आर्य ५८ रन्सची अर्धशतकी खेळी करून आउट झाला. तर वैभव सूर्यवंशी ३८ रन्सवर आउट झाला. ऋतुराज गायकवाड ३० रन्सवर आउट झाला. तर कर्णधार तिलक वर्माने ५९ रन्सची आक्रमक खेळी केली. कुमार कुक्षाग्रने देखील अर्धशतक केले. सुयश शेडगे ७ रन्सवर आउट झाला. तर विप्रज निगमने ३० रन्सची महत्वाची खेळी केली. अनुकूल रॉय ४ रन्सवर तर अंशूल कंबोज शून्यावर आउट झाला.