Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India A vs Australia A : वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी कांगारू गोलंदाजांना KL Rahul ने धु धु धुतलं…केला धमाका ठोकलं शतक!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी राहुलचे शतक ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलने इंडिया अ संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध शानदार कामगिरी केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 26, 2025 | 12:39 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

क्रिकेट चाहते सध्या आशिया कप २०२५ च्या उत्साहात बुडाले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर भारताचा अ संघ हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळत आहे. भारताचा संघ आता काही दिवसांमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी, टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलने इंडिया अ संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध शानदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावात शानदार शतक पूर्ण केले. राहुलने शतक गाठण्यासाठी १३८ चेंडू घेतले, या काळात १२ चौकार मारले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी राहुलचे शतक ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली राहुल वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करेल. या मालिकेपूर्वी इंडिया अ विरुद्ध त्याचे शतक हे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी एक मजबूत संदेश आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात ४२० धावा केल्या. भारताकडून मानव सुथारने पाच, तर गुरनूर ब्रारने तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर पहिल्या डावात भारताचा डाव १९४ धावांवर संपला. 

IND vs SL Preview : शेवटचा सराव सामना खेळणार आज टीम इंडिया! सुपर-4 सामन्यात होणार श्रीलंकेशी सामना, वाचा सविस्तर

भारताचा स्टार केएल राहुलने शतक ठोकले आहे, त्याने कमालीची कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चेलेंज केलं आहे. साई सुदर्शन वगळता इतर कोणत्याही खेळाडूने विशेष कामगिरी केली नाही. हेन्री थॉर्नटनने चार आणि टॉड मर्फीने दोन विकेट्स घेतल्या. राहुलने पहिल्या डावात फक्त ११ धावा केल्या, पण आता त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावून टीम इंडियाला अडचणीतून वाचवले आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलिया अ संघाने भारतीय संघासमोर ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

HUNDRED FOR KL RAHUL 💯 – Rahul smashed a terrific Hundred against Australia A while chasing 412 runs in the 2nd unofficial Test ⚡ A Special knock, KL Rahul 2.0 is roaring. pic.twitter.com/B7wJzsZYZI — Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2025

या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत ३ गडी गमावून २६१ धावा केल्या. सध्या चौथ्या दिवसाचे पहिले सत्र सुरू आहे. संघाला विजयासाठी अजूनही १५१ धावा करायच्या आहेत. केएल राहुल १०७ धावांवर नाबाद आहे, तर साई सदूरशन ९८ धावांवर नाबाद आहे. विजय सुनिश्चित करण्याची जबाबदारी दोन्ही खेळाडूंवर आहे. केएल राहुल हा टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे. त्याने ६३ कसोटी सामन्यांमध्ये १११ डावांमध्ये ३५.४१ च्या सरासरीने ३७८९ धावा केल्या आहेत.

या फॉरमॅटमध्ये त्याने १० शतके आणि १९ अर्धशतके ठोकली आहेत. गेल्या इंग्लंड दौऱ्यातही राहुलने असाधारण कामगिरी केली होती. त्याने पाच सामन्यांमध्ये १० डावांमध्ये ५३.२० च्या सरासरीने ५३२ धावा केल्या होत्या, ज्यात दोन शतकांचा समावेश होता. आता, राहुल २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपले कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करेल.

Web Title: India a vs australia a kl rahul thrashes australia bowlers ahead of west indies series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • cricket
  • India Vs Australia
  • KL. Rahul
  • Team India

संबंधित बातम्या

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर
1

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.