Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA U-15 World Cup : भारताचा डबल धमाका! कॅमेरूनला 2-1 ने हरवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद

FIFA U-15 World Cup मध्ये भारताने कॅमेरूनचा 2-1 असा पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. लालरेमरुआतफेलाचा निर्णायक गोल आणि गोलरक्षक जेनितच्या पेनल्टी बचावामुळे भारताने बाजी मारली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 25, 2026 | 03:29 PM
FIFA U-15 World Cup : भारताचा डबल धमाका! कॅमेरूनला 2-1 ने हरवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद

FIFA U-15 World Cup : भारताचा डबल धमाका! कॅमेरूनला 2-1 ने हरवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद

Follow Us
Follow Us:
  • संपूर्ण सामन्यावर भारचाचं वर्चस्व
  • लालरेमरुआतफेलाचा निर्णायक गोल
  • गोलरक्षक जेनितचा शानदार बचाव
फिफा अंडर-15 विश्वचषक 2026 (FIFA U-15 World Cup)  स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. रविवारी झालेल्या गटातील दुसऱ्या सामन्यात भारताने कॅमेरूनचा 2-1 असा पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पावसामुळे मैदानावर आव्हानात्मक परिस्थिती असतानाही भारतीय खेळाडूंनी जिद्दीने खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले. गोलरक्षक जेनित निंगथौजाम याने पेनल्टीसह अनेक महत्त्वाचे बचाव करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

अशी मिळाली भारताला आघाडी

होवसन कॉम्पिटिशन कॉम्प्लेक्सवर झालेल्या या सामन्यात भारताला पहिल्याच मिनिटाला आघाडी मिळाली. दीपक सिंह आरामबम याच्या कॉर्नर किकवर कॅमेरूनच्या फरेल न्गोबोने चुकून आपल्याच गोलपोस्टमध्ये बॉल टाकण्यात आला, अशा विचित्र स्थितीत भारताने1-0 अशी आघाडी घेतली.

यानंतर कॅमेरूनने आक्रमक खेळ करत भारतीय गोलक्षेत्रात दबाव निर्माण केला. मात्र, गोलरक्षक जेनितने अप्रतिम बचाव करत प्रतिस्पर्ध्यांचे प्रयत्न हाणून पाडले. 16व्या मिनिटाला फ्री-किक, तर 17व्या आणि 18व्या मिनिटाला मिळालेल्या संधींवर त्याने शानदार बचाव केला.

भारतानेही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. 14व्या मिनिटाला कर्णधार आर. लालरेमरुआतफेला याला गोल करण्याची संधी मिळाली; मात्र कॅमेरूनच्या बचावपटूने ऐनवेळी चेंडू अडवला.

Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, ‘हे’ बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार

सोहिल खानही चुकला

सामन्याच्या 20व्या मिनिटाला कॅमेरूनने बरोबरी साधली. नदाम मोख्तार याने उजव्या बाजूने दिलेला क्रॉस भारतीय खेळाडू मोहम्मद सोहिल खान याला लागून तो भारताच्या गोल पोस्टमध्ये गेला. त्यामुळे कॅमेरूनला 1-1 अशी बरोबरी साधता आली.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मात्र, मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना आघाडी घेता आली नाही.

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

लालरेमरुआतफेलाचा निर्णायक गोल

दुसऱ्या सत्रात भारताने नव्या जोमाने खेळाला सुरुवात केली. रोनांदेव अहेइबाम याला मैदानात उतरवल्यानंतर भारतीय संघाच्या आक्रमणाला अधिक धार मिळाली. 27व्या मिनिटाला रोनांदेवने मिडफिल्डमध्ये चेंडूवर ताबा मिळवत तो दीपककडे सोपवला. दीपकने गोलक्षेत्रात अचूक लो क्रॉस दिला. त्यावर कर्णधार आर. लालरेमरुआतफेला याने डाव्या पायाने चेंडूला गोल पोस्टची दिशा दाखवली. या गोलमुळे भारताने 2-1 अशी आघाडी घेतली.

गोलरक्षक जेनितचा शानदार बचाव

31व्या मिनिटाला कॅमेरूनला पेनल्टी मिळाल्याने भारताच्या विजयासमोर मोठे आव्हान उभे राहिले. नारा मेइतेई लौशंबम याच्याकडून हाताने चेंडू अडवला गेल्याने पंचांनी कॅमेरूनला पेनल्टी बहाल केली. मात्र, जेनित निंगथौजाम याने 32व्या मिनिटाला हारौना अब्दौले याची पेनल्टी रोखून भारताची आघाडी कायम राखली.

सामन्याच्या अखेरच्या टप्प्यातही भारताने आक्रमण सुरूच ठेवले. रोनांदेवच्या जोरदार फटक्यानंतर गोलरक्षकाने सौमोजित सरकार याची फ्री-किकही अडवली. अखेर भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला. या विजयामुळे गटात दोन्ही सामने जिंकणारा भारत एकमेव संघ ठरला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताकडून निर्णायक गोल कोणी केला?

    Ans: आर. लालरेमरुआतफेला याने 27व्या मिनिटाला गोल करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली.

  • Que: कॅमेरूनविरुद्ध भारताचा गोलरक्षक कोण होता?

    Ans: जेनित निंगथौजाम याने गोलरक्षणाची जबाबदारी सांभाळली. त्याने पेनल्टीसह अनेक महत्त्वाचे बचाव केले.

  • Que: भारताने स्पर्धेत सलग किती विजय मिळवले?

    Ans: भारताने सलग दोन विजय मिळवले असून, दोन्ही सामने जिंकणारा तो गटातील एकमेव संघ ठरला.

Web Title: India beat cameroon 2 1 fifa u 15 world cup 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Fifa
  • Football
  • India Team

संबंधित बातम्या

Nasser Hussain : रग्बी इंडियाच्या प्रशासनात नासेर हुसेन यांची एंट्री; ४० पैकी ३९ मते मिळवत ‘एसओएम’पदी निवड
1

Nasser Hussain : रग्बी इंडियाच्या प्रशासनात नासेर हुसेन यांची एंट्री; ४० पैकी ३९ मते मिळवत ‘एसओएम’पदी निवड

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा
2

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.