Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लासगो Commonwealth Games 2026 मध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा; ‘या’ स्थानावर केला मोहीमेचा शानदार शेवट

India commonwealth games 2026 medal Tally: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचा प्रवास संपला आहे. ग्लासगो येथे भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. पदतालिकरेत भारत कोणत्या स्थानी आहे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 03, 2026 | 01:49 PM
ग्लासगो Commonwealth Games 2026 मध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा; ‘या’ स्थानावर केला मोहीमेचा शानदार शेवट
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा
  • शानदार कामगिरी करत भारत चौथ्या स्थानी
  • पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताची सुवर्ण कामगिरी
राष्ट्रकुल क्रीडेचा ( Commonwealth Games 2026) २३ वा हंगाम संपला आहे. यंदाचा हंगाम स्कॉटलंड येथे आयोजित करण्यात आला होता. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा २०२६ स्पर्धेतील भारताच्या सर्व स्पर्धा पूर्ण झाल्या आहेत. या स्पर्धेत भारताने पदक तालिकेत चौथे स्थान मिळवून इतिहास रचला आहे. स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारतीय खेळाडूंनी सायकलिंग आणि ज्युडोमध्ये भाग घेतला, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी, बॉक्सिंग, ज्युडो, ॲथलेटिक्स आणि पॅरा-ॲथलेटिक्समधील प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने १६ पदके जिंकली. भारताची पदकतालिकेत आता १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य जिंकली आहेत.

Abhishek Sharma चा रौद्रावतार, गोलंदाजांना धू धू धुतले; अवघ्या 91 चेंडूत ठोकल्या 233 धावा, Video Viral

शानदार कामगिरी करत भारत चौथ्या स्थानी

या स्पर्धेत,कुस्ती, बॅडमिंटन आणि हॉकीसारखे आपले प्रमुख खेळ नसतानाही भारताने दमदार कामगिरी केली. बॉक्सिंगमधील विक्रमी सात सुवर्णपदके, ज्युडोमध्ये प्रथमच मिळवलेली दोन सुवर्णपदके आणि ॲथलेटिक्समधील अनेक ऐतिहासिक कामगिरींमुळे भारताची ही मोहीम ऐतिहासिक ठरली. ११ दिवसांच्या या खेळांमध्ये भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण ३९ पदके जिंकली आहे आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा यांच्या पाठोपाठ भारताने चौथे स्थान पटकावले आहे.

भारतीय खेळाडूंची स्पर्धेतील मोहिम संपल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी X प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान वाटतो. भारताने १३ सुवर्णपदकांसह एकूण ३९ पदके जिंकल्याचा अभिमान आणि आनंद आहे. पदक विजेत्यांचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत आपल्या प्रतिभावान खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, दृढनिश्चय आणि समर्पण दाखवले. त्यांची मेहनत आपल्या तरुणांना प्रेरणा देत राहील. संपूर्ण भारतीय खेळाडूंना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी अशीच सर्वोत्तम कामगिरी करत देशाला गौरव मिळवून द्यावा.’

Proud of our contingent’s performance at the Glasgow Commonwealth Games. Delighted that India has won 39 medals, including 13 Golds. Congrats to the medal winners. Throughout the Games, our talented athletes have displayed exceptional skill, determination and dedication.… — Narendra Modi (@narendramodi) August 3, 2026

ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी

ऑस्ट्रेलियाने ७० सुवर्ण, ४५ रौप्य आणि ५६ कांस्य पदकांसह एकूण १७१ पदके जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडने २९ सुवर्ण ४५ रौप्य आणि २६ कांस्यसह एकूण ११० पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कॅनडा १९ सुवर्ण आणि एकूण ६२ पदकांसह पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. स्कॉटलंड ३९ पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. भारत आणि स्कॉटलंडने प्रत्येकी १३ सुवर्ण पदके जिंकली आहेत, परंतु भारताकडे १७ रौप्य पदके आहेत, तर स्कॉटलंडकडे केवळ ९ आहेत. अधिक रौप्य पदके असल्यामुळे भारत चौथ्या स्थानावर आहे.

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताची सुवर्ण कामगिरी

देशाने ॲथलेटिक्स आणि पॅरा-ॲथलेटिक्समध्ये १६ पदके जिंकली. बॉक्सिंगमध्ये भारताने सर्वाधिक, सात सुवर्ण पदके जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. याव्यतिरिक्त, भारताने वेटलिफ्टिंगमध्ये एकूण आठ पदके मिळवली. ज्युडोमध्ये चार पदके जिंकून भारताने आपली ताकद दाखवून दिली. भारताने पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकही जिंकले. अशा पाच स्पर्धा होत्या ज्यात भारताने दुहेरी पदक मिळवले.

बॉक्सिंग रिंगमध्ये भारताच्या ‘गोल्डन बॉईज’चे वादळ! सचिन सिवाच-अंकुश पंघालची CWG 2026 मध्ये सुवर्ण कामगिरी

Web Title: India commonwealth games glasgow medal tally on 4th position with 39 medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • India news
  • indian athletes
  • Medal

संबंधित बातम्या

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर
1

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
2

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक
3

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.