
या सिरिजमध्ये पहिल्या टी-२० सामन्यात ८२ रन्स आणि दुसऱ्या सामन्यात ३९ रन्सची तुफानी खेळी करत अभिषेक शर्माने एका स्थानाची सुधारणा रॅंकिंगमध्ये केली आहे. त्याने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावले आहे. भारतीय फलंदाज ईशान किशन टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. सध्या अव्वल स्थानी असलेला ईशान किशन आणि दुसऱ्या क्रमांकावरील अभिषेक शर्मा यांच्यात ५१ रेटिंग पॉईंट्सचा फरक आहे.
दुसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या २२ चेंडूंत ५७ रन्सची स्फोटक खेळी करणाऱ्या संजू सॅमसनलाही रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. चार स्थानांची झेप घेत तो आता ३० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. टी२० सिरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी क्रमवारीत मोठी झेप घेत आपली स्थाने मजबूत केली आहेत.
IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
गुगली आणि फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणणारा भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती दोन स्थानांची सुधारणा करत जागतिक क्रमवारीत थेट पाचव्याक्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने तब्बल सात स्थानांची मोठी झेप घेत पुन्हा एकदा टॉप-१० मध्ये स्थान मिळवले असून, तो आता १० व्या स्थानावर पोहोचला झाला आहे.
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १५९ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करताना भारताने 3 विकेट्स गमावत केवळ 14.5 ओव्हरमध्ये दुसरा सामनाही जिंकला आहे आणि ही मालिका आपल्या खिशात घातली आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन दोघांनीही आज झंझावाती खेळी करत पॉवरप्लेमध्ये ८२ धावा कुटल्या. आता तिसरा सामना दिल्लीत अरूण जेटली स्टेडियमवर १७ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी