Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत

IND vs AFG Day 2 Stumps: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 07, 2026 | 05:50 PM
IND vs AFG Test : दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा; पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा, अफगाणिस्तान अडचणीत
Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या दिवशीही भारताचा दबदबा
  • पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचा जलवा
  • अफगाणिस्तान अडचणीत
मुल्लांपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर अफगाणिस्तानची पहिल्या डावातील धावसंख्या ११३/५ आहे. रहमत शाह सध्या ४३ धावा करून नाबाद आहे. फिरकीपटू मानव सुथारने पदार्पणातच तीन विकेट्स घेतले, तर प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेट्स घेतले. पहिल्या डावातील एकूण धावसंख्येनुसार, अफगाण संघ अजूनही ४५१ धावांनी मागे आहे. भारतीय संघाने ८ विकेट्स गमावून ५६४ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता.

IND Vs AFG; गिल-राहुलची शतकी जुगलबंदी; अफगाणिस्तानविरुद्ध भारताची मजबूत पकड, पहिला डाव 564 वर घोषित

अफगाणिस्तानवर भारताचा दबदबा कायम

अफगाणिस्तानच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. पदार्पण करणाऱ्या मानव सुथारच्या गोलंदाजीवर सलामीवीर अब्दुल मलिक  अवघ्या १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने एका अप्रतिम चेंडूवर सेदिकुल्ला अटलला १७ धावांवर बाद केले. त्यानंतर सुथारने रहमानुल्ला गुरबाजला १२ धावांवर बाद करून अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकलले.अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी चांगल्या लयीत दिसत होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. प्रसिद्ध कृष्णाने शाहिदीला धावांवर बाद केले. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, मानव सुथारने आसिफ झाझाईला ३ धावा बाद करून भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. आता अफगाण संघाच्या सर्व आशा रहमत शाहवर अवलंबून आहेत.

भारताची धडाकेबाज फलंदाजी

मुल्लांपूर कसोटी सामन्यात, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मानव सुथारची भारतीय संघात निवड झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी सावध सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी ४८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. अफगाण गोलंदाजांनीही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. मोहम्मद सलीम साफीने शुभमनला बाद करून भारताची चौथी विकेट मिळवली. गिल १७७ चेंडूंचा सामना करून १२६ धावांवर बाद झाला. त्याच्या या खेळीत १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे, पंतचे शतक हुकले आणि त्याने ८१ धावा केल्या. ध्रुव जुरेल १९ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि मानव सुथार यांनी सूत्रे हाती घेतली आणि सातव्या विकेटसाठी ५४ धावा जोडल्या. मानव सुथारने २८, यशस्वीने २४, मोहम्मद सिराजने २२ आणि ध्रुव जुरेलने १९ धावा केल्या. अखेरीस भारताने ५६४-८ धावांवर डाव घोषित केला.

A dream debut continues in whites 🤍 Wicket No. 3️⃣ for Manav Suthar 👏 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/29ugmUzVZl — BCCI (@BCCI) June 7, 2026

सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे भारतीय संघाच्या बाजूने होता. सलामीवीर केएल राहुलने १६५ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण करत आपले १२ वे कसोटी शतक झळकावले आणि संघाला भक्कम सुरुवात करून दिली. या खेळीत ११ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलनेही सर्वाधिक १२६ धावांची संयमी पण प्रभावी खेळी केली. गिलनेही ११ चौकार आणि एका षटकारासह १३८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे गिलचे ११ वे कसोटी शतक होते. युवा फलंदाज साई सुदर्शनने ८१ धावा करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. या तिघांच्या भागीदारीमुळे भारताने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

भारतीय संघ: केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

अफगाणिस्तान संघ: सेदीकुल्ला अटल, रहमानउल्ला गुरबाज, अब्दुल मलिक, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अफसर झाझाई (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगेलिया खरोती, झियाउर रहमान शरीफी आणि मोहम्मद सलीम सफी.

Manav Suthar Milestone: पदार्पण असावं तर असं! पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट तर २५ वर्षांपूर्वीचा दुर्मिळ रेकॉर्डही काढला मोडीत

Web Title: India vs afghanistan test day 2 manav suthar 3 wickets afghanistan score 113 5 india domiated game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • indian cricket team
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
4

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.