Mohammad Shami: 'रावळपिंडी एक्सप्रेस'ला मागे टाकत शमीने केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड; क्रिकेट विश्वात उडवली खळबळ
World Record: भारत आणि इंग्लंड संघामध्ये सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू होती. त्यातील पाचवा सामना हा मुंबई येथे पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजचा पाचवा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तूफान खेळी करत 135 धावा केल्या. अभिषेक शर्माच्या खेळीमुळे भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे हा सामना भारताने सहज जिंकला. मात्र या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत या 5 व्या सामन्यात मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. 25 धावांमध्ये तीन बळी टिपले. 2023 नंतर मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट घेतल्या आहेत. तसेच शमीने एक विश्वविक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याने तीन विकेट घेऊन एक नवीन रेकॉर्ड केला आहे. मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय सामन्यात 450 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे.
मोहम्मद शमी हा 450 विकेट्स घेणारा 8 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्यांच्या आधी अनिल कुंबळे, हरभजन सिंग. कपिल देव, झहीर खान, रवींद्र जाडेजा आणि श्रीनाथ या गोलंदाजांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शमीने शोएब अख्तर आणि जसप्रीत बुमराहला देखील मागे टाकले आहे.
हेही वाचा: IND Vs SA Final: टीम इंडियाने जिंकला दुसरा U-19 ‘वर्ल्ड कप’; 9 विकेट्सनी उडवला ‘चोकर्स’चा धुव्वा
टीम इंडियाकडून इंग्लंडचा 150 धावांनी धुव्वा
भारत आणि इंग्लंड संघामध्ये सध्या पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू होती. त्यातील पाचवा सामना हा मुंबई येथे पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजचा पाचवा टी-20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने याआधीच मालिका खिशात घातली आहे. पाचव्या सामना जिंकून भारताने या मालिकेचा शेवट गोड केला आहे. भारताच्या फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही बाजूने इंग्लंडला धूळ चारली आहे.
भारताने ही मालिका आधीच जिंकली होती. मात्र हा सामना मोठ्या धावांनी जिंकून या मालिकेचा शेवट गोड करण्यात आला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला 248 धावांचे आव्हान दिले होते. त्यामध्ये अभिषेक शर्माने तडाखेबंद खेळी केली. त्याने 54 चेंडूत 135 धावा केल्या. तर इंग्लंडला केवळ 97 धावाच करता आल्या. भारताच्या भेदक गोलंदाजांनी इंग्लंडला 97 वरच रोखले. आव्हान खरेतर कठीण होते. इंग्लंडची सुरुवात चांगली झालेली. मात्र त्यानंतर भेदक गोलंदाजीपूढे इंग्लंडच्या धडाधड विकेट पडत गेल्या.
हेही वाचा: India Vs England 5th T20: अभिषेकची वादळी खेळी अन्…; टीम इंडियाकडून इंग्लंडचा 150 धावांनी धुव्वा
अभिषेक शर्माने इंग्लंडला धू-धू धुतला; 54 चेंडूत 135 धावांची वादळी खेळी
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तडाखेबंद शतक लगावले आहे. अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतकी खेळी केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अभिषेक शर्माचे वादळ घोंघावत होते. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजांना त्याने सेट होऊ दिले नाही. 118 व्या ओव्हरमध्ये शर्मा बाद झाला. त्याने 54 चेंडूत 135 धावा ठोकल्या.