कोण आहे जय मुंद्रा (फोटो सौजन्य - X.com)
जय मुंद्राने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली
First international appearance. First delivery. First wicket. Some introduction from Jai Moondra! 👏#BackingGreen | #IREvIND | #FáilteSolar pic.twitter.com/nV6IfgWHpZ — Cricket Ireland (@cricketireland) June 26, 2026
डावखुरा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. तो भारताच्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला बाद केले. ताशी १३९ किमी वेगाच्या चेंडूने संजूच्या बॅटची कड घेतली आणि तो यष्टीवर आदळला. त्याने ४ चेंडूंमध्ये ५ धावा केल्या.
आयर्लंडसाठी त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट
जय मुंद्राचा जन्म १० जानेवारी १९९७ रोजी राजस्थानमधील टोंक येथे झाला. लहानपणापासूनच जयला शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर क्रिकेटची आवड होती. तो राजस्थानच्या १४ वर्षांखालील संघाचा भाग होता आणि त्याने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला. जय सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा, पण नंतर त्याने लेदर बॉलचा वापर सुरू केला. एम.टेक. करण्यासाठी जय विद्यार्थी व्हिसावर आयर्लंडला गेला, जिथे तो क्रिकेट खेळण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने डब्लिनमधील प्रसिद्ध लेन्स्टर क्रिकेट क्लबसाठी खेळायला सुरुवात केली. तो २०२३ मध्ये आयरिश सिनियर कप जिंकणाऱ्या संघाचाही एक भाग होता.
जयचा चुलत भाऊ स्वीडनकडून खेळतो
विशेष म्हणजे, जयच्या काकांचा मुलगा, अजय मुंद्रा, स्वीडनकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. यष्टीरक्षक-फलंदाज अजयने स्वीडनसाठी ३१ टी२० सामने खेळले असून, ३०.५० च्या सरासरीने ७९३ धावा केल्या आहेत. त्याने पाच अर्धशतके झळकावली आहेत, ३८ झेल घेतले आहेत आणि दोन खेळाडूंना यष्टीचीत केले आहे. दरम्यान आता जयनेही एका सामन्या संजू सॅमसनची मोठी विकेट घेतल्यामुळे तो काही क्षणातच चर्चेत आला आहे आणि आता त्याचेही सोशल मीडियावर चाहते एका रात्रीत वाढले तर नक्कीच आश्चर्याची गोष्ट ठरणार नाही.






