Champion Trophy 2025: Who will get the trophy if the final match between India and New Zealand is cancelled due to rain? 'This' team has more chance..
Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 9 मार्च रोजी दुबईत हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. भारत या सामन्यात तिसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरणार आहे. तर न्यूझीलंडला दुसरे विजेतेपद मिळवायची आस असेल. पण, पावसामुळे हा सामना रद्द झाला तर? अशा परिस्थितीत कोणत्या संघाला विजेता घोषित करून चॅम्पियन्स ट्रॉफी मिळणार आहे? चला जाणून घेऊया.
न्यूझीलंड संघाने शेवटचे विजेतेपद 2000 साली जिंकले होते. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे हा सामना खूपच अतिटतीचा होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म बघता दोन्ही संघ विजेतपदासाठी मुख्य दावेदार मानले जाता आहेत. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहिल्यानंतर बरोबरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूझीलंडला 2019 च्या विश्वचषक फायनलमध्ये अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता, ज्यामध्ये सामना बरोबरीत सुटला पण चौकारांच्या संख्येच्या आधारावर इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
हेही वाचा : Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागसमोर उभे ठाकले मोठे संकट; धाकट्या भावाला पोलिसांकडून अटक; नेमकं प्रकरण काय?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम फेरीचा सामना 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात खेळवला जाणार आहे. हा सामना जर बरोबरीत सुटला, तर सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित केला जाईल. जर सुपर ओव्हर देखील टायमध्ये संपली, तर एक संघ विजयी होईपर्यंत सुपर ओव्हर खेळल्या जाणार आहे. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानमधील तीन सामाने पावसामुळे रद्द करावे लागले होते. परंतु, अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार असल्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे.
तथापि, जर पावसाने अंतिम फेरीत व्यत्यय आणला आणि सामाना धुवून काढला, तर सामना राखीव दिवशी म्हणजे 10 मार्च रोजी खेळला जाणार आहे. जर दुसऱ्या दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजयी घोषित करण्यात येईल. यापूर्वी 2002 मध्ये पावसामुळे भारत आणि श्रीलंका या संघाना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते.
हेही वाचा : Champions Trophy 2025 : भारताने अंतिम सामना गमावल्यास बसेल ‘इतक्या’ कोटींचा फटका अन्.. ; वाचा सविस्तर..
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत सलग चार एकदिवसीय सामने जिंकून भारतीय संघाने पसंतीची टीम म्हणून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दुबईत खेळणे त्यांना परिस्थितीशी परिचित असल्यामुळे त्यांना फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, न्यूझीलंडने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडला भारताच्या फिरकीपटूंचा प्रभावीपणे सामना करावा लागणार आहे.
भारतीय संघाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा
न्यूझीलंड संघाची प्लेइंग 11
विल यंग, डेरेल मिचेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओ’रोर्क